राज कपूर आणि नर्गीस यांच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा, तिला बघताच फिदा झाले होते शोमॅन.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:55 PM1 / 11बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता आणि शोमन म्हटले जाणारे राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ मध्ये झाला होता. राज कपूर यांनी ५० वर्षांच्या आपल्या करिअमध्ये कॅमेराच्या पुढे आणि मागे अनेक चांगली कामे केली आहेत. 2 / 11ज्यासाठी त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर,पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज कपूर यांच्या फिल्मी करिअरसोबत त्यांची पर्सनल लाइफही चर्चेत होता. 3 / 11ज्यासाठी त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर,पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज कपूर यांच्या फिल्मी करिअरसोबत त्यांची पर्सनल लाइफही चर्चेत होता. 4 / 11राज कपूर आणि नर्गीस दत्त यांची पहिली भेट १९४८ मध्ये झाली होती. दोघांच्या भेटीचा किस्सा फारच इंटरेस्टींग आहे. जेव्हा नर्गीस आणि राज कपूर यांची पहिली भेट झाली होती तेव्हा नर्गीस केवळ २० वर्षांची होती. 5 / 11राज कपूरही त्यावेळी केवळ २२ वर्षांचे होते. पण नर्गीस यांनी या २० वर्षात ८ सिनेमे केलेही होते आणि राज कपूर आपल्या करिअरची सुरूवात करत होते.6 / 11नर्गीस यांची भेट झाली तेव्हा राज कपूर यांना कोणताही सिनेमा दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नव्हती. राज कपूर यांना त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी स्टुडिओचा शोध होता. 7 / 11त्यांना समजलं होतं की, नर्गीस यांची आई फेमस स्टुडिओमध्ये रोमियो अॅन्ड ज्युलिएटची शूटींग करत आहेत. त्यांना जाणून घ्यायचं होतं की, तिथे कशाप्रकारची सुविधा आहे.8 / 11राज कपूर यासंबंधी बोलण्यासाठी नर्गीस यांच्या घरी गेले होते आणि नर्गीस यांनी स्वत: दरवाजा उघडला होता. त्या किचनमधून धावत आल्या होत्या. त्या किचनमध्ये भजी तळत होत्या.9 / 11बेसनाने भरलेले हात केसांना लागले होते. नर्गीस यांची हीच अदा राज कपूर यांना फारच आवडली होती. तेव्हाच ते नर्गीस यांच्याकडे आकर्षित झाले होते.10 / 11दरम्यान, राज कपूर आणि नर्गीस दत्त यांची जोडी पडद्यासोबतच रिअललाईफमध्येही पसंत केली जात होती. दोघांची केमिस्ट्री जबरदस्त होती. 11 / 11दोघांना सोबत जवळपास १६ सिनेमे केले होते आणि ९ वर्षे ही जोडी हिट बनून होती. दोघांच्या अफेअरची चर्चा तर जोरात होती. लोकांना वाटत होतं की, दोघे लग्न करतील. पण तसं होऊ शकलं नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications