Join us

IN PICS " थाला ते थलपती...! तुम्हाला माहितीये का तामिळ स्टार्सच्या या टायटलमागची स्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:55 PM

1 / 8
साऊथ स्टार्सच्या नावांसमोर एक खास टायटल लागलेलं दिसतंच दिसतं. विशेषत: तामिळ सिनेमाच्या स्टार्सच्या नावासोबत एक टायटल लागलेलं असतंच. रजनीकांत पासून तर कमल हासन, विजय सेतूपतीपर्यंत सगळ्यांच्या नावासोबत एक टायटल आहे. थलायवा असो वा थाला किंवा मग थलपती... या टायटल्समागे एक कहाणी आहे. काहींच्या मागे भावना आहे तर काहींच्या मागे मार्केटींगचा फंडा...
2 / 8
रजनीकांत यांनी १९९५ साली करिअरला सुरूवात केली. पण त्यांना खरा ब्रेक मिळाला तो १९७८ साली भैरवी नावाच्या सिनेमातून. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी चेन्नईच्या एका थिएटरबाहेर रजनी यांचे ३५ फूट कटआऊट लावण्यात आलं. यावर रजनीकांत यांच्या नावासोबत सुपरस्टार लिहिलेलं होतं. सुरूवातीला रजनीकांत सुपरस्टार या उपाधीबद्दल कम्फर्टेबल नव्हते. हा शब्द फक्त एमजीआर व शिवाजी गणेशन यांच्यासाठीच आहे, असं रजनीकांत यांचं मत होतं. पण हळूहळू जनतेने रजनीकांत यांना सुपरस्टार बनवलंच. पुढे रजनीकांत यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आणि जनतेने त्यांना थलायवा ही उपाधी बहाल केली. लीडर वा बॉस असा त्याचा अर्थ होतो.
3 / 8
कमल हासन यांचा एक दुजे के लिए रिलीज झाला तेव्हा या सिनेमाच्या एका पोस्टमध्ये त्यांना भारताचा नंबर १ सुपरस्टार म्हटलं गेलं होतं. खरं तर ८० च्या दशकात कमल हासन माेठे सुपरस्टार झाले होते. पण १९९२ साली तेवर मगन हा सिनेमा आला आणि या सिनेमाने धमाका केला. भारताने हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवला. हा सिनेमा ऑस्कर आणू शकतो, असं लोक म्हणू लागले. याच भावनेतून कमल हासन यांना युनिव्हर्सल स्टार वा उलगनायगन टायटल दिलं गेलं. दिग्दर्शक के. एम. रविकुमार यांनी कमल हासनसाठी उलगनायगन हे टायटल पहिल्यांदा वापरलं. याशिवायही कमल हासन यांना एक टायटल दिलं गेलं आहे. ते आहे नम्मावर. याचा अर्थ होतो आमचा माणूस.
4 / 8
९० च्या दशकात डेब्यू करणारे अजित कुमार यांचा २००१ साली दीन नावाचा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमानं त्यांना ॲक्शन हिरो ही ओळख दिली. या चित्रपटाच्या एका गाण्यात त्यांच्या पात्रासाठी थाला या शब्दाचा वापर केला गेला होता. मग काय, तेव्हापासून अजित कुमार यांच्या नावापुढे थाला हे टायटल लागलं. याचा अर्थ होतो लीडर.
5 / 8
तेरे नाम हा सलमानचा सिनेमा तुम्हाला ठाऊक असेलच. हा सेतू या तामिळ सिनेमाचा रिमेक होता. अभिनेता विक्रम या सिनेमात हिरो होता. विक्रम म्हटलं तर कदाचित लोक त्याला ओळखणार नाहीत. पण चियान विक्रम म्हटलं तर लगेच त्याचा चेहरा डोळ्यांपुढे येतो. सेतु या सिनेमात विक्रमने साकारलेल्या पात्राचं नाव चियान होतं. तामिळमध्ये गांभीर्य आणि ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. तेव्हापासून त्याला चियान विक्रम याच नावाने ओळखलं गेलं.
6 / 8
जोसेफ विजय चंद्रशेखर याने १९९४ मध्ये रसिगन या सिनेमात काम केलं. या सिनेमाच्या रिलीजवेळी पहिल्यांदा त्याच्या नावासमोर इलयाथलपती हे टायटल लागलं. याचा अर्थ होतो युवा नेता. २०१७ मध्ये दिग्दर्शक एटली यांनी त्याच्यासोबत मर्सल हा सिनेमा बनवला. ४३ वर्षाच्या हिरोच्या नावासमोरून यंग हा शब्द काढला जायला हवा, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी विजयला थलपती विजय या नरवाने इंट्रोड्यूस केलं. यानंतर विजय हा थलपती विजय नावानेच ओळखला जाऊ लागला.
7 / 8
सूर्याने २००१ साली नंदा या सिनेमात काम केलं. या सिनेमातील सूर्याचा सॉलिड अभिनय पाहून चाहत्यांनी त्याला नदिप्पिन नायकन हे टायटल दिलं. याचा अर्थ होतो कलेत सर्वोत्कृष्ट, निपुण असलेला. या टायटलचा वापर तसा कमी केला गेला. पण नंतर हे टायटल जणू त्याच्याचसाठी बनलंय, हे त्याने आपल्या ॲक्टिंगमधून प्रूव्ह केलं.
8 / 8
विक्रम वेधा, सुपर डिलक्स, ९६ सारखे सुपरहिट सिनेमा देणारा विजय सेतुपतीला मक्कल सेल्वन म्हटलं जातं. याचा अर्थ होतो ज्याच्याकडे जनतेच्या प्रेमाची श्रीमंती आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर जनता ज्याच्यावर अपार प्रेम करते. हे टायटल त्याला दिग्दर्शक सीनू रामस्वामी यांनी धर्मदुराई या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दिलं होतं.
टॅग्स :Tollywoodरजनीकांतसेलिब्रिटीकमल हासन