Join us

राजकुमार राव व पत्रलेखाची लव्हस्टोरी जगापेक्षा न्यारी, पाहा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:46 PM

1 / 12
न्यूटन, बरेली की बर्फी, शादी में जरूर आना अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकणारा राजकुमार राव सध्या यशाच्या शिखरावर आहे. आज राजकुमारचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या त्याची लव्हस्टोरी
2 / 12
राजकुमार राव प्रेमात आहे, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. अभिनेत्री अन्तिवा पॉलसोबत (स्क्रीन नेम पत्रलेखा) दीर्घकाळापासून तो रिलेशनशिपमध्ये आहे.
3 / 12
राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते.
4 / 12
या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही आपले फोटो सर्रास शेअर करतात.
5 / 12
राजकुमार व पत्रलेखाची लव्हस्टोरी कशी सुरु झाली तर ‘लव सेक्स और धोखा’ हा सिनेमा पाहून.
6 / 12
होय, ‘लव सेक्स और धोखा’ या सिनेमात राजकुमारला काय विचित्र मुलगा आहे, असे पत्रलेखाला वाटले होते. पण पुढे ती याच विचित्र मुलाच्या प्रेमात पडली.
7 / 12
राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट झाली, तेव्हा या लव्हस्टोरीची खरी सुरुवात झाली. होय, पत्रलेखाला पाहताच लग्न करेन तर हिच्याशीच असे राजकुमारने मनात ठरवून टाकले होते.
8 / 12
प्रेमात पडले तेव्हा राजकुमार व पत्रलेखा दोघेही स्ट्रगल करत होते. राजकुमार जवळ सध्यासारखा पैसा नव्हता. तरीही राजकुमारने पत्रलेखाला एक महागडी बॅग गिफ्ट केली होती. एका विदेश प्रवासात तिची ही बॅग नेमकी चोरीला गेली. ती प्रचंड दु:खी झाली आणि तिने राजकुमारला ही गोष्ट सांगितली. पण ती विदेशातून घरी परतली तेव्हा घरात अगदी तशीच एक बॅग तिला दिसली.
9 / 12
एकदा राजकुमार पत्रलेखाला भेटायला जाणार होता. पण तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. मग काय, त्याने तिथेच गाडी थांबवली आणि पायी जुहूकडे धावत सुटला. पत्रलेखासाठी हा इमोशनल क्षण होता.
10 / 12
पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
11 / 12
राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती.
12 / 12
एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.
टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखा