हातावर मेहंदी न काढताच पत्रलेखा लग्नमंडपात; 'ही' बंगाली परंपरा केली फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:48 PM1 / 7कलाविश्वातील बहुचर्चेत ठरलेला राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला आहे. १५ नोव्हेंबर रोजी चंदीगढमधील द ओबेरॉय सुखविलास स्पा रिजॉर्टमध्ये या दोघांनी ग्रँड वेडिंग केलं.2 / 7लग्न झाल्यानंतर राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.3 / 7सध्या सोशल मीडियावर पत्रलेखाच्या ब्रायडल लूकची चर्चा होत आहे. तिच्या लेहंग्यापासून ते तिच्या दागिण्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.4 / 7पत्रलेखाच्या साजशृंगारामध्येच तिच्या मेहंदीची जोरदार चर्चा रंगली आहे. लग्न म्हटलं की नववधूच्या हातावर मेहंदी ही हमखास काढण्यात येते. परंतु, पत्रलेखाने मेहंदी न काढताच लग्नमंडपात आली. 5 / 7पत्रलेखा बंगाली कुटुंबातील असल्यामुळे लग्नातील अनेक परंपरा बंगाली रिती-रिवाजानुसार पार पडल्या. त्यामुळे पत्रलेखाने मेहंदी काढली नव्हती.6 / 7बंगाली रितीप्रमाणे लग्नात नववधूच्या हातावर मेहंदीऐवजी आलता लावण्यात येतो. त्यामुळे पत्रलेखानेही हातावर आलता लावला होता.7 / 7 विशेष म्हणजे केवळ आलताच नव्हे तर पत्रलेखाने तिच्या दुपट्ट्यावरही बंगाली भाषेत प्रेमाचा मंत्र लिहिला होता. 'अमर पोरन भौरा भालोबासा अमी तोमे सोमोरपोन कोरिलम',असं तिच्या दुपट्ट्यावर लिहिलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications