कुठे गायब झाली मराठमोळी राजलक्ष्मी खानविलकर? ७ महिन्यात पहिलं तर १४ वर्षांनी दुसरंही लग्न मोडलं By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 2:29 PM1 / 8एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्माला आलेली अभिनेत्री राजलक्ष्मी खानविलकर (Rajlaxmi Khanvilkar). १४ ऑक्टोबर १९७६ रोजी तिचा जन्म झाला. सुरुवातीला आपल्या सौदर्यामुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री रातोरात जशी स्टार झाली तशीच रातोरात गायबही झाली. 2 / 8राजलक्ष्मीच्या घरचं वातावरण खूपच कडक होतं. त्यामुळे ना तिने कधी शॉर्ट कपडे घातले आणि ना तिला सिनेमात काम करण्याची परवानगी मिळाली. मात्र तिने कसंतरी तिच्या वडिलांचं मन वळवलं आणि ती जाहिरातींमध्ये झळकली.3 / 8ती श्यामक दावरच्या व्हिडिओमध्ये दिसली. तसंच BPL OYE शोजमध्ये सहभागी झाली. तसंच कॅडबरी चॉकलेटच्या जाहिरातीतही तिने काम केलं.4 / 8१९९६ साली कॅडबरीच्या जाहिरातीवेळीच तिची पहिली भेट अभिनेता समीर सोनीसोबत (Samir Soni) झाली. यानंतर मैत्री, प्रेम आणि ते थेट लग्नबंधनात अडकले. मात्र त्यांचा संसार केवळ ७ महिनेच टिकला. लग्नानंतर एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 5 / 8समीर सोनी पहिल्या लग्नाविषयी म्हणाला होता की त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या प्रीमिअर दिवशीच त्यांचा घटस्फोट झाला. तो हा दिवस कधीच विसरु शकत नाही असंही म्हणाला. तसंच समीरला त्यांच्या नात्याला आणखी वेळ द्यायची संधी द्यायची इच्छा होती. मात्र तसं झालं नाही. 6 / 8 २००१ साली आलेल्या 'अशोका' या शाहरुख खान आणि करिना कपूरच्या सिनेमात तिने एका डान्स साँग केलं. 'आ तयार हो जा' असे त्या गाण्याचे बोल होते. या डान्समध्ये तिने शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केली.7 / 8पहिलं लग्न मोडल्यानंतर राजलक्ष्मी 2000 साली पुन्हा लग्नबंधनात अडकली. 1990 साली आलेल्या 'आशिकी' या सिनेमात अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy) रातोरात स्टार झाला होता. राजलक्ष्मी त्याच्या प्रेमात पडली आणि तोही तिच्या प्रेमात होता. दोघांनी लग्न केलं मात्र लग्नानंतर तब्बल १४ वर्षांनी 2014 साली त्यांचा संसार मोडला.8 / 8राजलक्ष्मी अतिशय देखणी आणि उत्तम डान्सर होती. मात्र तिने जास्त काम केलं नाही आणि कायम वैयक्तिक आयुष्यामुळेच ती जास्त चर्चेत राहिली. सध्या ती कुठे आहे, काय करते याविषयी कोणालाच कल्पना नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications