Rakhi Sawant : एका पतीसोबत घटस्फोट, दुसरा तुरुंगात, राखीला करायचंय तिसरं लग्न; म्हणते, "आई व्हायचंय" By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:52 AM1 / 13ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा राखी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दोन लग्नानंतर राखी आता तिसर्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे.2 / 13राखी पुन्हा एकदा तिच्या स्वप्नांच्या राजकुमाराबद्दल मीडियाशी बोलताना दिसली. राखीने सांगितले की, तिच्या खास मित्राचे नाव लकी आहे. राखीने पापाराझींना लकीबद्दल न बोलण्याची विनंती केली. तो खूप छान मुलगा आहे. त्याला मीडियासमोर यायचं नसल्याचं देखील सांगितलं.3 / 13पापाराझीसोबत तिच्या लाईफ पार्टनरबाबत बोलताना राखी सावंतने तिची एक इच्छा व्यक्त केली की तिला स्वतःचं आता आणखी एक स्वयंवर करायचं आहे, जेणेकरून तिला लग्नासाठी एक चांगला मुलगा मिळेल.4 / 13अभिनेत्री पापाराझींना म्हणाली की, तुम्ही सर्वांनी माझं स्वयंवर पार्ट 2 करायला हवं. मला अशा एका मुलाची गरज आहे जो राखी सावंतच्या मुलाचा बाप होऊ शकेल.5 / 13'मला आता आई व्हायचं आहे. मी आता एक जोडीदार शोधत आहे जो माझ्या मुलाचा पिता बनू इच्छितो. चला ही नवीन स्पर्धा सुरू करूया. मी माझ्या मुलाच्या वडिलांना शोधत आहे.'6 / 1344 वर्षीय राखी सावंतने आतापर्यंत दोन वेळा लग्न केलं आहे आणि आता ती तिसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. राखीचं पहिलं लग्न बिझनेसमन रितेशसोबत झालं होतं. तेव्हा देखील तिची चर्चा रंगली होती. 7 / 13राखीने बिग बॉसमध्ये नॅशनल टीव्हीवर रितेशचा चेहरा रिवील केला होता. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनीही त्यांचं नातं तोडलं. यानंतर राखीच्या आयुष्यात आदिल खान दुर्रानीची एन्ट्री झाली. 8 / 13आदिल आणि राखीच्या प्रेमाची देखील जोरदार चर्चा रंगली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये आदिल राखीला भेटण्यासाठी देखीला बिग बॉसच्या घरात आला होता. काही महिन्यांनी दोघांच्या निकाहाचे फोटो व्हायरल झाले. 9 / 13राखीने आदिलसोबत गुपचूप निकाह केला होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. मात्र यानंतरच काही महिन्यांनी राखीने आदिलवर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 13आदिलने राखीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील अभिनेत्रीने म्हटलं आहे. राखीने पोलिसांत तक्रार केली असून आदिल याप्रकरणी जेलमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी राखीने आदिलपासून तलाक घेत असल्याने ब्रेकअप पार्टीचे आयोजन केलं होतं. 11 / 13व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसली होती. ती आपला आनंद व्यक्त करताना दिसली. ती म्हणाली होती की, मी शेवटी तलाक घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी आहेत पण मी आनंदी आहे. 12 / 1313 / 13 आणखी वाचा Subscribe to Notifications