Join us  

“आदिलचे मुलांबरोबर शरीरसंबंध होते”, राखीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “माझे न्यूड व्हिडिओ बनवून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 7:11 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. राखीने पती आदिल खानवर फसवणूक आणि मारहाण केल्याचे आरोप केले होते. तिने आदिलविरोधात तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी आदिल सहा महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले.
2 / 7
राखीने ड्रग्ज देऊन न्यूड व्हिडिओ बनवल्याचा आरोप आदिलने केला होता. तसंच, लाखो रुपये खर्च करण्यास भाग पाडल्याचंही आदिलने म्हटलं होतं. आदिलच्या या आरोपांवर राखीने मंगळवारी(२२ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उत्तर दिलं आहे.
3 / 7
यामध्ये राखीने एक्स पती आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. आदिलचे मुलांबरोबर शरीरसंबंध होते. तो घरातच मुली आणि मुलांबरोबरही सेक्स करायचा. जेव्हा याचा विरोध करायचे तेव्हा तो मला मारायचा, असा आरोप राखीने केला आहे.
4 / 7
आदिलच्या आरोपांना उत्तरं देताना राखी कॅमेरासमोरच रडू लागली. “आदिल खानने माझे न्यूड व्हिडिओ बनवून ते ५०-५५ लाखांना विकले आहेत. हनीमूनचेही प्रायव्हेट व्हिडिओ आदिलने बनवले होते. तेदेखील त्याने विकले आहेत,” असं म्हणत राखीने पुन्हा एकदा आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.
5 / 7
आदिलच्या ड्रग्ज देण्याच्या आरोपांवरही राखीच्या वकिलाने उत्तर दिलं. “जर खरंच असं झालं होतं, तर त्याने न्यायालयात या गोष्टी सांगायला हव्या होत्या. तेव्हा तो काहीच बोलला नाही. आणि आता सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला या गोष्टी आठवत आहेत,” असं ते म्हणाले.
6 / 7
राखी सावंतने मारहाण केल्याचे खोटे आरोप केल्याचं आदिलचं म्हणणं होतं. याबाबत राखीने स्पष्टीकरण दिलं. ती म्हणाली, “पोलीस आणि मेडिकल रिपोर्टही खोटे आहेत का? हे सगळं खरं आहे. म्हणूनच कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा आदिलवर दाखल करण्यात आला.”
7 / 7
दरम्यान, राखी सावंतने मे २०२२मध्ये आदिल खानबरोबर कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं होतं. यानंतर त्यांचा निकाहही झाला होती. सात महिन्यांनी बिग बॉस मराठीमधून बाहेर येताच राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. राखीने मुस्लीम धर्म स्वीकारून तिचं नावही बदललं होतं. अनेकदा तिने नमाज पठण करतानाचे व्हिडिओही शेअर केले होते.
टॅग्स :राखी सावंतबिग बॉसबॉलिवूडटिव्ही कलाकार