बालपणापासून आत्तापर्यंत...! कधीही पाहिले नसतील राखी सावंतचे हे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 1:59 PM1 / 11राखी सावंत म्हणायला पक्की ‘ड्रामा क्वीन’आहे. पण गेल्या 24 वर्षांपासून ती फिल्म इंडस्ट्रीत घट्ट पाय रोवून उभी आहे. तिने जे काही मिळवलंय ते स्वबळावर मिळवलंय. राखीच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. पण ती थांबली नाही.2 / 11राखी तिच्या आयुष्यात खूश आहे. अलीकडे तिने बालपणापासून तर आत्तापर्यंतचे फोटो शेअर करत, आयुष्याच्या प्रवासाची एक झलक दाखवली.3 / 11बालपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास... मी खूप खूश आहे, असे लिहित राखीने अनेक फोटो शेअर केले आहेत.4 / 11आईच्या जवळ अगदी काही महिन्यांची असतानाचा आईच्या जवळ खेळत असतानाचा तिचा फोटो तर फारच क्यूट आहे.5 / 11 एका फोटोत राखीने गंगावन लावले आहे. फोटोत दिसणारे तिचे लांबसडक केस खोटे असले तरी डोळे मात्र अगदी बोलके आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.6 / 11 राखीने 1997 मध्ये रूही सावंत या नावाने डेब्यू केला होता. फार कमी लोकांना ठाऊक असेल पण राखीचे खरे नाव नीरू भेदा आहे. तिचा पहिला सिनेमा होता ‘अग्निचक्र’.7 / 11चित्रपटात येण्याआधी राखीने बराच संघर्ष केला. घरच्या गरिबीमुळे अगदी 50 रूपये रोजाने वाढपीचे कामही केले.8 / 1110-11 वर्षांची असताना राखीने टीना अंबानीच्या लग्नात वाढपीचे काम केले होते.9 / 11मुंबईच्या एका चाळीत राखीचे बालपण गेले. तिच्या घरच्या महिलांना बाल्कनीत उभे राहण्याची परवानगी नव्हती.10 / 11राजीव खंडेलवालच्या चॅट शोमध्येही राखीने तिचा स्ट्रगल सांगितला होता. अनेकदा शेजारी उरलेले अन्न फेकून द्यायचे आणि राखी ते उचलून आणून खायची, असे तिने सांगितले होते.11 / 11सध्या राखीची आई कॅन्सरशी झुंज देतेय. राखी दिवसरात्र तिची सेवा करतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications