Join us

IN PICS : जे कोणाला नाही जमले ते राम चरणने करून दाखवले, केवळ 233 दिवसांत रचला अनोखा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 8:00 AM

1 / 10
साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या ‘आरआरआर’ या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. यात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर लीड भूमिकेत आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, एसएस राजमौली. यामुळे ‘आरआरआर’बद्दल प्रचंड क्रेज पाहायला मिळतेय. अशात रामचरणने साऊथ सिनेजगतात एक विक्रम रचला आहे.
2 / 10
होय, ‘आरआरआर’ रिलीज होण्याआधीच रामचरणने एका विक्रमावर नाव कोरले आहे. ते सुद्धा केवळ 233 दिवसांत.
3 / 10
तर यावर्षी मार्च महिन्यांत रामचरणने ट्विटर ज्वॉईन केले होते. ट्विटर ज्वॉईन केल्याच्या केवळ 233 दिवसांतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे.
4 / 10
केवळ 233 दिवसांत 10 कोटी ट्विटर फॉलोअर्स मिळवणारा रामचरण साऊथचा पहिला अभिनेता ठरला आहे.
5 / 10
आत्तापर्यंत कोणत्याही साऊथ कलाकाराने इतक्या कमी वेळात 10 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठलेला नाही.
6 / 10
इन्स्टाग्रामवर रामचरणचे 31 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम त्याने वर्षभरापूर्वी ज्वॉईन केले होते.
7 / 10
रामचरण हा साऊथ मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट सिनेमे दिलेत.
8 / 10
दिग्दर्शक एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात रामचरण रामाराजूच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर ज्युनियर एनटीआर भीमच्या भूमिकेत दिसणार आहे.
9 / 10
‘आरआरआर’चा फुलफॉर्म म्हणजे राइज (उदय), रिव्होल्ट (बंडखोरी) आणि रोर (गर्जना). हा सिनेमा 1920 च्या भारतीय क्रांतिकारकांची एक काल्पनिक कथा . हा चित्रपट 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होईल.
10 / 10
या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री आलिया भट हेही खास भूमिकेत दिसणार आहेत.
टॅग्स :राम चरण तेजा