Join us

लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 13:45 IST

1 / 8
अलिकडेच रामचरणच्या RRR चित्रपटाने हॉलिवूडमध्ये ही आपला डंका वाजवला आहे.हॉलिवूडचे अनेक अवॉर्डस आपल्या नावावर केले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
पर्सनल आणि प्रोफेशनल दोनही आयुष्यात रामचरण आनंदाचा अनुभव घेतो आहे. लवकरच रामचरण बाबा होणार आहे. त्याची पत्नी उपासना प्रेग्नेंट आहे.लग्नाच्या १० वर्षानंतर रामचरण आणि उपासना आई-बाबा होणार आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
उपासना ही अपोलो लाइफची व्हॉइस प्रेसिडेंट आहे. त्यामुळे ती परदेशात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
'गुड मॉर्निंग अमेरिका'या प्रसिद्ध न्यूज शोमध्ये राम चरण दिसल्यानंतर,यांची जोरदार चर्चा रंगली की,हे कपल अमेरिकेत आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्याचं प्लॅनिंग करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
मात्र,राम चरणची पत्नी आपल्या पहिल्या बाळाला आपल्याच देशात जन्म देणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं.उपासनाने ट्विटरवर स्पष्ट केले की,'माझी डिलिव्हरी भारतात होईल. या प्रवासामुळे आम्हाच्यासाठी अनेक अद्भुत अनुभव आले आहेत आणि आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची वाट पाहत आहोत.'(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
तिच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल तिचा उत्साह व्यक्त करताना उपासनाने लिहिले, 'माझ्या देशात - भारतात माझ्या पहिल्या बाळाला जन्म देताना मी रोमांचित आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनी हे दक्षिणेतील प्रसिद्ध जोडपे आहे. त्यांच्यातील बाँडिंग जबरदस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
उपासना आणि रामचरण यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :राम चरण तेजाTollywoodआरआरआर सिनेमा