Join us

PHOTOS: आलिशान घर,महागड्या कार,आलिया भट रणबीर कपूरकडे आहे कोट्यवधींची संपत्ती,Net worth पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 3:32 PM

1 / 10
रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि आलिया भट (Alia Bhatt ) यांची जोडी चित्रपट जगतात खूप पसंत केली जाते. सध्या या जोडीचा 'ब्रह्मास्त्र’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवं रेकॉर्ड तयार करतोय. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
रणबीर- आलिया ही जोडी बॉलीवूडमधील अत्यंत श्रीमंत जोडी मानली जाते. या पॉवर कपलची नेटवर्थ आपण जाणून घेणार आहोत.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
रणबीर कपूर हा ‘कपूर’ घराण्याचा वारसदार आहेच. शिवाय एक दमदार अभिनेताही आहे. GQ Indiaनुसार, रणबीरची एकूण संपत्ती 337 कोटी रूपये आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
चित्रपटांशिवाय जाहिरातींमधूनही तो बक्कळ कमाई करतो. एका रिपोर्टनुसार, रणबीर एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी फी घेतो आणि जाहिरातीसाठी सुमारे 5 कोटी रूपये चार्ज करतो.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
रणबीरकडे मुंबईत एक लक्झरी अपार्टमेंट आहे. अलिशान गाड्या तर विचारू नका. रणबीरकडे अलिशान BMW X6 गाडी आहे. याची किंमत 1.02 कोटी रूपये आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
याशिवाय Lexus, Mercedes-Benz GL Class, Audi R8 आणि Range Rover अशा गाड्याही त्याच्याकडे आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
आलिया भटही संपत्तीच्या बाबतीत कमी नाही. आलिया 21.7 मिलियन डॉलरची मालकीण आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
भारतीय रूपयांत सांगायचं झाल्यास, तिच्याकडे 158 कोटींची संपत्ती आहे. मुंबईत वांद्रे आणि जुहूमध्ये तिची दोन लक्झरी अपार्टमेंट आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
याशिवाय Covent Garden मध्येही तिनं एक घर खरेदी केलं आहे. आलियाकडे सुद्ध Range Rover Evoque, Audi A6, Q5, BMW 7अशा अलिशान गाड्या आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
रणबीर व आलियाची संपत्ती एकत्र केली तर दोघंही 495 कोटींचे मालक असतील.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर