Join us

रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:58 IST

1 / 7
कपूर कुटुंब सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत असतं. प्रत्येक सणासुदीच्या दिवशी कपूर कुटुंबातले सदस्य एकमेकांसोबत सेलिब्रेशन करतात. या कुटुंबाने नुकतंच न्यू इयर सेलिब्रेशन केलंय
2 / 7
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने हे खास फोटो शेअर केलेत. या फोटोत तिच्यासोबत भाऊ रणबीर कपूरने खास पोज दिली
3 / 7
रिद्धिमाची आई नीतू कपूर आणि मुलगीही यावेळी उपस्थित होते. माय-लेकींनी न्यू इयरसाठी ग्लॅमरस कपडे परिधान केले होते
4 / 7
या फोटोत आलिया भटची आई सोनी राजदानही दिसून येत आहेत. रिद्धिमाचं आलियाच्या आईसोबतही मैत्रीपूर्ण नातं दिसून येतं
5 / 7
या सेल्फीत कपूर भावंडं अर्थात रिद्धिमा-रणबीर आई नीतूसोबत दिसून येतात. एकूणच कपूर कुटुंबाने न्यू इयरचं सेलिब्रेशन जोरदार केलंय
6 / 7
कपूर कुटुंब प्रत्येक सणाच्या वेळी एकत्र येतात. ही नक्कीच या कुटुंबाची खासियत आहे. प्रत्येकजण शूटिंग, कामातून वेळात वेळ काढून एकमेकांसोबत मजा करताना दिसतात
7 / 7
कपूर कुटुंबाच्या न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं राहाने. रणबीरच्या कडेवर असलेल्या राहाने यावेळी फोटो काढताना तोंड वळवलं असल्याचं दिसतं. राहा सर्व पापाराझींची लाडकी आहे
टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटरिद्धिमा कपूरनितू सिंग