आलिया झाली रणबीरची 'दुल्हनिया'; पाहा त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे खास Photos By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 7:41 PM1 / 8गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची. 2 / 8अखेर आज १४ एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आलिया आता मिसेस कपूर झाली आहे.3 / 8मुंबईतील पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये आलिया रणबीरने पंजाबी पद्धतीने लग्नगाठ बांधली. 4 / 8आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार, लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आता आलिया यापुढे मिसेस कपूर या नावाने ओळखली जाणार आहे.5 / 8या लग्नाविषयी प्रत्येक गोष्ट टॉप सिक्रेटप्रमाणे ठेवली होती. त्यामुळे या लग्नाविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.6 / 8नुकतेच या लग्नसोहळ्यातील आलिया- रणबीरचे काही फोटो समोर आले आहेत.7 / 8लग्नासाठी आलिया आणि रणबीरने खास ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले होते. यात आलियाने लेहंगा तर रणबीरने शेरवानी परिधान केली होती. ज्यामुळे दोघंही रॉयल लूकमध्ये दिसत होते.8 / 8'आज, एकत्र कुटुंब, मित्रपरिवार यांनी सगळं घर भरुन गेलं होतं. आमची आवडती जागा ज्या बाल्कनीत आम्ही आमच्या नात्याची ५ वर्ष एकत्र घालवली...आम्ही लग्न केलं. आता नव्या आठवणी जोडण्यासाठी आम्ही अधिक काळ वाट पाहू शकत नाही. आठवणी ज्या प्रेम, हास्य, शांतता, मुव्ही नाईट, वेड्यासारखे वाद. आमच्या आयुष्यातील या खूप महत्त्वाच्या दिवशी आमच्यावर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव करण्यासाठी मनापासून धन्यवाद. या क्षणांना आणखी खास केलं आहे', अशी पोस्ट आलियाने हे फोटो शेअर करत लिहिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications