दीपिका ते कतरिना... मोठी आहे रणबीरच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी, आलियाने काय दिली होती यावर प्रतिक्रिया? By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 4:05 PM1 / 7बी-टाऊनमध्ये सध्या आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. येत्या 13 एप्रिल ते 18 एप्रिलदरम्यान हे कपल लग्न करणार असल्याचं मानलं जातंय.2 / 7आलिया व रणबीरच्या लव्ह रिलेशनशिपबद्दल बोलायचं तर दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आलिया तर रणबीरच्या प्रेमात अक्षरश: वेडी आहे.3 / 7खरं तर भूतकाळात रणबीर अनेकींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अगदी दीपिका पादुकोण, कतरिना कैफ या बड्या अभिनेत्रींना रणबीरने डेट केलं.4 / 7या दोघींशिवाय अनेकींशी रणबीरचं नाव जोडलं गेलं. अगदी अनेक वर्ष बॉलिवूडचा प्लेबॉय म्हणूनच रणबीरला ओळखलं जातं होतं.5 / 7पण आलियाला यामुळे काहीही फरक पडत नाही. रणबीरच्या भूतकाळातील लव्ह रिलेशनशिपची तिचा जराही पर्वा नाही.6 / 7यामुळे काय फरक पडतो? प्रत्येक व्यक्तिचा एक भूतकाळ असतो आणि याची पर्वा करतो कोण? आणि तसंही मी थोडीच त्याच्यापेक्षा कमी आहे..., असं आलिया फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, ते म्हणूनच.7 / 7रणबीर इतकाही कठीण व्यक्ती नाही. तो खूप साधा मुलगा आहे. प्रेमळ व्यक्ती आहे. काश, मी त्याच्याइतकी प्रेमळ असती असं मला नेहमी वाटते. एक अभिनेता, एक व्यक्ती प्रत्येकबाबतीत तो माझ्यापेक्षा सरस आहे, असं आलिया या मुलाखतीत म्हणाली होती. एकंदर काय तर रणबीरच्या आयुष्यात काय घडून गेलं, याची आलियाला फिकीर नाही. प्रेम आणि नात्यावरचा विश्वास हेच तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications