'हा तर केबलवाला'; रणबीर कपूरच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 2:55 PM1 / 9बॉलिवूडचा हँडसम हंक, चॉकलेट बॉय अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर(Ranbir Kapoor). उत्तम अभिनयासोबतच गूड लुकिंगमुळे रणबीर कायम चर्चेत असतो.2 / 9तरुणींमध्ये रणबीरची कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे या रॉकस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचा प्रयत्न करत असतात.3 / 9सध्या सोशल मीडियावर रणबीरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात त्याने लूक चेंज केल्याचं दिसून येत आहे.4 / 9रणबीरच्या एका फॅनपेजवर त्याच्या नव्या लूकचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.5 / 9वांद्र्यातील धर्मा प्रोडक्शन ऑफिसच्या बाहेर रणबीरला स्पॉट करण्यात आलं असून सोशल मीडियावर त्याची कमालीची चर्चा आहे.6 / 9व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्याने बिअर्ड लूक केला आहे. सोबतच व्हाइट शर्टावर ब्लू डेनिम जॅकेट आहे. या लूकमध्ये तो जरी कुल वाटत असला तरीदेखील अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.7 / 9'अरे हा तर केबलवाला आहे', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'हा अवतार एकदम भिकाऱ्यासारखा केलाय', असंही काही जणांनी म्हटलं आहे.8 / 9रणबीर लवकरच 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहे.9 / 9ब्रह्मास्त्र ती पार्टमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यात पहिला पार्ट ९ सप्टेंबर २०२२ मध्ये रिलीज होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications