Photos: आदर जैन गोव्याच्या किनारी अडकला लग्नबेडीत, एक्स गर्लफ्रेंडच्या 'बेस्ट फ्रेंड'शी केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:35 IST
1 / 10Aadar Jain marries Alekha Advani in Goa: आदर जैन (Aadar Jain) गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसोबत (Alekha Advani) लग्नबंधनात अडकला आहे. 2 / 10गोव्याच्या किनारी हा शाही सोहळा पार पडला. ख्रिश्चन पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी अख्खं कपूर कुटुंब हजर होतं.3 / 10आदर आणि आलेखा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 4 / 10आदर हा व्हाईट आणि ब्लू आउटफिटमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. त्याचा हा डॅशिंग लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. आदर जैन हा रिमा जैन यांचा मुलगा आहे. तर रिमा जैन या दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या कन्या आहेत. अर्थात आदर जैन हा म्हणजेच रणबीर, करिश्मा आणि करीना यांचा आतेभाऊ आहे.5 / 10आलेखानं सुंदर असा व्हाईट रंगाचा गाऊन परिधान केला होता. यात ती सुंदर दिसत होती. आलेखा आता करीना आणि करिश्माची नणंद झाली आहे. 6 / 10लग्नाचा आनंद आदर आणि आलेखा यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. 7 / 10या दोघांनाही त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 8 / 10अलेखा अडवाणी यशस्वी उद्योजिका आहे. परदेशात शिक्षण घेतल्यानंतर तिनं भारतात अनेक सेमिनार आणि रिट्रीटद्वारे आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'वे वेल' ची स्थापना केली.9 / 10आदर जैनने काही महिन्यांपूर्वी समुद्रकिनारी अलेखाला प्रपोज केलं होतं. दोघे सोशल मीडियावर एकमेंकासोबतचे फोटो शेअऱ करत असतात. 10 / 10आदर जैन हा काही वर्ष अभिनेत्री तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाला. काही महिन्यांनी आदरने अलेखासोबतचं नातं जाहीर केलं. विशेष म्हणजे अलेखा ही तारा सुतारियाची बेस्ट फ्रेंड होती. अलेखानमं स्वत:ला आदर आणि ताराच्या रिलेशनशिपमधलं तिसरं चाक असंही म्हटलं होतं. अलेखा हीच दोघांच्या ब्रेकअपचं कारण असल्याची चर्चा आहे.