माधुरी दीक्षित ते इम्रान हाश्मी! 'या' 5 कलाकारांना किसिंग सीन दिल्याचा होतोय पश्चाताप By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 4:00 PM1 / 10करिश्मा कपूर - बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या करिश्मा कपूरने राजा हिंदुस्तानी या सिनेमा किसिंग सीन दिला होता. 2 / 10अभिनेता आमिर खानसोबत हा सीन शूट झाला होता. मात्र, हा सीन केल्याचा आजही करिश्माला पश्चाताप होतो. या सीनचं तीन दिवस शुटिंग सुरु होतं.3 / 10कंगना रणौत - अभिनयशैलीसह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रणौत हिनेदेखील एका सिनेमात किसिंग सीन दिला आहे.4 / 10शाहिद कपूर याच्यासोबत कंगनाने रंगून या सिनेमात किसिंग सीन दिला होता. एका मुलाखतीमध्ये तिने हा सीन करताना भयानक अनुभव आल्याचं म्हटलं होतं.5 / 10रणबीर कपूर- बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून रणबीर कपूरकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे आजवर रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे.6 / 10जग्गा जासूस या सिनेमात रणबीरने कतरिना कैफसोबत किसिंग सीन दिला होता. परंतु, हा सीन त्यांच्या ब्रेकअपनंतर शूट झाला होता. त्यामुळे हा सीन केल्याचा त्याला आजही पश्चाताप होतो.7 / 10माधुरी दीक्षित - बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने वयाच्या २० व्या वर्षी पहिला किसिंग सीन दिला होता. हा सीन करताना माधुरी प्रचंड रडली होती.8 / 10दयावान या सिनेमात तिने किसिंग सीन दिला होता. हा सीन केल्यानंतर तिला बराच पश्चाताप झाला होता.9 / 10इम्रान हाश्मी- सीरियल किसर म्हणून इम्रान हाश्मीकडे पाहिलं जातं. मात्र, मर्डर सिनेमात त्याने दिलेल्या किसिंग सीनचा त्याला आजही पश्चाताप होतो.10 / 10 या सिनेमात किसिंग सीन शूट करत असताना त्याला प्रचंड विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications