मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:03 AM 2021-04-19T11:03:33+5:30 2021-04-19T11:09:09+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये काही व्हॅकेशनसाठी बिनधास्त फिरताना दिसतायेत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही कोरनाची लागण झाली होती, कोरोनामुक्त होताच दोघेही सध्या मालदीव्हजला रवाना झालेत. अभिनेता रणबीर कपूरला ९ मार्चला करोना व्हायरसचा संसर्ग झाला होता.
त्याचपाठोपाठ आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली होती.
आता दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत.एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रणबीर कपूर आलिया भट्टसह व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी मालदीव्हजला रवाना झाले आहेत.
सध्या शूटिंग बंद असल्यामुळे आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी व्हॅकेशसाठी गेले आहेत.
रणबीरच्या आयुष्यात मागच्या वर्षभरात अनेक कठीण प्रसंग आले पण आलिया नेहमीच त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.
रणबीरला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी 11 वर्षांची होते. तेव्हापासूनच मला तो आवडायला लागला होता,असे आलियाने सांगितले होते.
'ब्लॅक' सिनेमाच्या सेटवर मी रणबीरला पहिल्यांदा पाहिले होते. रणबीर संजय लीला भन्साळींचा असिस्टंट म्हणून काम करत होता.
त्यादिवशी मी रणबीरला पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीतच मला तो आवडला होता, असे आलियाने सांगितले होते.