PHOTOS : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान रणवीर व दीपिका पहिल्यांदाच दिसले एकत्र, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 3:36 PM1 / 10रणवीर सिंग व दीपिका पादुकोण बॉलिवूडचं स्टार कपल आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये बिनसल्याची चर्चा होती. प्रकरण घटस्फोटापर्यंत आल्याचंही म्हटलं गेलं होतं.2 / 10रणवीर व दीपिकात बिनसल्याच्या चर्चा ऐकून या कपलचे चाहते टेन्शनमध्ये आले होते. पण अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दीपवीर काल पब्लिकली एकत्र दिसले.3 / 10 घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान रणवीर आणि दीपिकाने एका अवार्ड सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीर आणि दीपिका नेहमीप्रमाणे हटके स्टाइलमध्ये दिसले.4 / 10या पुरस्कार सोहळ्यातील दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत. 5 / 10दीपिका आणि रणवीर यांनी नेहमीच्या अंदाजात अवार्ड नाईटमध्ये हजेरी लावली. एकमेकांच्या हातात हात घालून दोघांनी झक्कास एन्ट्री घेतली.6 / 10 मीडियाला दोघांनीही एकमेकांसोबत मस्तपैकी पोझ दिल्या. यादरम्यान दोघांच्या अतरंगी फॅशनने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.7 / 10या इव्हेंटमध्ये दीपिका लाल कलरचा टॉप, मॅचिंग कोट आणि पँट अशा अवतारात दिसली. तर रणवीर ब्ल्यू कलरचा शर्ट, ड्रॅगन ब्लॅक पँट व कोट घालून दिसला. यावेळी रणवीरच्या नेकपीसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.8 / 10अनेकांनी यावरून दोघांची खिल्लीही उडवली. या दोघांना झिरो ड्रेसिंग सेन्स आहे. ही काय फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे, अशा कमेंट अनेकांनी केल्या. रणवीरला कपड्यांचा सेन्स नाही. त्याच्यासोबत राहून दीपिकाचाही फॅशन सेन्स खराब झाला आहे, असं एका युजरने लिहिलं.9 / 10 रणवीर आणि दीपिका 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती. पण गेल्या काही दिवसांपासून दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा पसरल्या होत्या.10 / 10अर्थात रणवीरने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. दीपिकानेही या अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र गेल्या अनेक दिवसांत ही जोडी पब्लिकली दिसली नव्हती. अखेर काल ही जोडी एकत्र दिसली आणि चाहते सुखावले. आणखी वाचा Subscribe to Notifications