Join us

'रवीना खोटारडी, मनोरुग्ण तिला...' अजय देवगण अन् रवीना टंडनच्या नात्याचा असा झाला शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 9:42 AM

1 / 9
90 च्या दशकात अनेक लव्ह स्टोरी गाजल्या. काही जोड्या यशस्वी झाल्या तर काहींचे नाते तुटले. त्यातलीच एक जोडी म्हणजे रवीना टंडन आणि अजय देवगण यांची. दोघांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. दोघांची ऑनस्क्रीन जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
2 / 9
रवीना आणि अजय देवगण एकमेकांच्या प्रेमात आहेत अशा तेव्हा चर्चा सुरु होत्या. मात्र दोघांनी कधीच यावर अधिकृत भाष्य केले नाही. प्रेमाच्या चर्चांमध्येच दोघांमध्ये अचानक काहीतरी बिनसल्याचीही चर्चा सुरु झाली आणि नात्याचा शेवट झाला.
3 / 9
एका मुलाखतीत अजय देवगणने रवीनाला खोटारडी असे म्हणले होते. अजयने मला अनेक लव्ह लेटर्स लिहिले, ते मी सर्वांना दाखवू शकते असं विधान रवीनाने केलं होतं. यावर अजय देवगण चांगलाच संतापला होता आणि तिला माध्यमांसमोरच जन्मत:च खोटारडी असे म्हणले होते.
4 / 9
अजय देवगण एका मुलाखतीत म्हणाला रवीना टंडन खोटारडी आहे. मी कधीच तिच्या प्रेमात पडलो नाही. याच कारणामुळे कदाचित ती अशा खोट्या अफवा पसरवत आहे.
5 / 9
अजय देवगणला लव्हलेटर्स बाबत विचारले असता तो म्हणाला मी कोणतेही लव्हलेटर्स लिहिलेले नाही. जर लिहिले आहेत तर ते छापायला दे. मला सुद्धा बघायचे आहेत.
6 / 9
जगात शेवटचे काम रवीना आणि मनिषा कोईराला सोबतच जरी राहिले असेल तरी ते मी करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया अजयने दिली होती.
7 / 9
इतकंच नाही तर अजयने रवीनाला मनोरुग्ण म्हणले होते. मी रवीनाला मनोरुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पूर्ण तयार आहे असं तो म्हणाला होता.
8 / 9
अजय आणि रवीनाने दिलवाले, कयामत, एक ही रास्ता, गैर अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. एकामागोमाग एक बरेच हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत.
9 / 9
रवीना टंडनला नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तिच्या अभिनय आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल तिला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
टॅग्स :दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टअजय देवगणरवीना टंडनरिलेशनशिपबॉलिवूड