रविना टंडनने पहिल्यांदाच शेअर केले मुलीच्या लग्नाचे Unseen photos By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 2:28 PM1 / 10बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असते. यात अनेकदा ती काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.2 / 10अलिकडेच रविनाने तिच्या मुलीच्या छायाच्या लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.3 / 10रविनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये या लग्नसोहळ्यातील काही निवड फोटोंचा समावेश करण्यात आला आहे.4 / 10या फोटोमध्ये रविनाचं संपूर्ण कुटुंब दिसून येत आहे.5 / 10ज्यावेळी जीवन सुंदर आठवणी आणि क्षणांनी बहरलेलं असतं. लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, सदा सौभाग्यवती भव: असं कॅप्शन रविनाने या फोटोला दिलं आहे.6 / 10रविनाने १९९५ मध्ये छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेत सिंगल पॅरेंट झाली होती. त्यावेळी रविना केवळ २१ वर्षांची होती.7 / 10रविनाने २००४ मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केलं. त्यावेळी पूजा आणि छायाला दत्तक घेऊन ९ वर्ष झाली होती.8 / 10छाया आणि पूजा रविनाच्या चुलत भावाच्या मुली आहेत. या भावाचं निधन झाल्यानंतर त्याच्या पश्चात दोन मुली होत्या. 9 / 10परंतु, या दोन लहान मुलींसोबत घरातील प्रत्येक नातेवाईकांनी त्यांच्यासोबत दुजाभाव केला. त्यामुळे मी या मुलींना माझ्या घरी आणलं आणि नंतर कायदेशीररित्या त्यांना दत्तक घेतलं, असं रविनाने एका मुलाखतीत सांगितलं. 10 / 10रविनाने शेअर केलेला लग्नातील दोन चिमुकल्यांचा फोटो आणखी वाचा Subscribe to Notifications