Raveena Tandon Daughter : पद्मश्री पुरस्काराच्या आनंदात रवीनाची पार्टी, लेक 'राशा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 5:07 PM1 / 9बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त तिने फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसोबत आनंद साजरा केला. रवीनाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2 / 9 रवीनाचा आनंद सध्या आनंद गगनात मावेनासा झालाय. ४८ वर्षीय रवीनाला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.3 / 9रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये रवीना खूपच सुंदर दिसत आहे. हातात फुगे घेऊन ती हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.4 / 9या पार्टीतील फोटोजमध्ये सर्वांचेच लक्ष रवीनाच्या लेकीवर जात आहे. रवीनाची मुलगी राशा १७ वर्षांची असून ती आणि तिच्या मैत्रिणीही पार्टीत चांगल्याच एंजॉय करताना दिसल्या.5 / 9राशाने धीरुभाई अंबानी शाळेतून शिक्षण घेतलं आहे.तिला गाण्याचीही आवड आहे. इतकंच नाही तर तिने तायक्वांदोचेही प्रशिक्षण घेतले आहे. रवीना प्रमाणेच राशाही खूपच सुंदर दिसते.6 / 9राशाचे पूर्ण नाव राशाविशाखा थडानी आहे. राशाचा अर्थ पावसाचा थेंब आणि विशाखाचा अर्थ भगवान शिव आहे. रवीनाने पाठीवर राशाचे नावाचा टॅटू बनवला आहे.7 / 9राशाला म्युझिक आणि डान्समध्ये इंटरेस्ट आहे.मात्र तिला अभिनयापेक्षा दिग्दर्शनात जास्त रस आहे. 8 / 9रवीनाला एक मुलगाही आहे ज्याचे नाव रणबीरवर्धन थडानी आहे. त्याचा जन्म २००८ मध्ये झाला तर रवीनाने लग्नाआधीच दोन मुलींना दत्तक घेतले होते. 9 / 9रवीनाने फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत २००४ मध्ये लग्न केले. उदयपुरच्या जग मंदिर पॅलेस येथे त्यांनी लग्नगाठ बांधली. आणखी वाचा Subscribe to Notifications