को-स्टारने Kiss केल्यानंतर रवीनाला झाली होती उलटी, म्हणाली, 'माझ्या मुलीने सिनेमात...' By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 11:10 AM1 / 8९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) आजही तितकीच सुंदर आहे. रवीनाला इंडस्ट्रीत तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. 2 / 8तर आता तिची लेक राशा थडानीही अगदी आईसारखीच आहे. राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर रवीना बऱ्याच वर्षांनी पुन्हा अक्षय कुमारसोबत सिनेमा करत आहे.3 / 8रवीना त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने कधीच ऑनस्क्रीन किसींग सीन दिला नाही. मात्र एक किस्सा असा आहे जेव्हा कोस्टारने तिला किस केले होते. यानंतर काय झालं हे रवीनाने नुकतंच मुलाखतीत सांगितलं.4 / 8रवीना म्हणाली,'मी नेहमीच ऑनस्क्रीन किस करण्यापासून दूर राहिले आहे. मी अशा सीन्समध्ये कधीच कंफर्टेबल नसते. मात्र एकदा को-स्टारने मला चुकून किस केलं. हे स्क्रीप्टमध्ये नव्हतं. यानंतर मी इतकी असहज झाले की मला उलटीच झाली. त्या अभिनेत्याने माझी माफी मागितली.'5 / 8सिनेमाच्या शूटदरम्यान व्हिलनसोबत माझा तो सीन होता. आम्ही रफ हैंडलिंग सीन शूट करत होतो. त्यातच चुकून त्याचे ओठ माझ्या ओठांना लागले. यानंतर मी पळतच रुममध्ये गेले आणि मला उलटी झाली.'6 / 8त्या प्रकारानंतर मला असं झालं की छी यार, जा ब्रश करा आणि कमीत कमी 100 वेळा तोंड धुवा.' रवीनाने यावेळी त्या अभिनेत्याचं नाव तर घेतलं नाही पण तो खलनायकाच्या भूमिकेत होता हे तिने सांगितलं. मात्र तिने आजपर्यंत पडद्यावर किसींग सीन दिला नाही.7 / 8रवीनाला जेव्हा राशाने सिनेमात किसींग सीन द्यावा की नाही याबद्दल मत विचारलं तेव्हा ती म्हणाली,'हे पूर्णपणे तिच्यावरच अवलंबून आहे. जर ती कंफर्टेबल असेल तर काही नाही आणि जर तिची मर्जी नसेल तर तिला कोणी जबरदस्ती करु शकत नाही. हा पूर्णपणे तिचाच निर्णय असेल.'8 / 8राशा आता १८ वर्षांची आहे. ती तिच्या डेब्यू सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. राशा थडानी डेब्यूआधीच तिच्या लुक्समुळे तरुणांची क्रश बनली आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो, पापाराझींनी पोस्ट केलेले व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications