'लगान' सिनेमातून रातोरात स्टार बनल्यानंतरही ग्रेसी सिंग बनली साध्वी, जाणून घ्या यामागचे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:46 PM1 / 10 पण निवडक सिनेमा केल्यानंतर ग्रेसीची करिअरची गाडी रुळावरुन घसरली.सिनेमाच्या ऑफर्स मिळणे बंद झाल्यानंतर ग्रेसीने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला होता.2 / 10 20 जुलै 1980 रोजी नवी दिल्लीत तिचा जन्म झाला. ग्रेसीचे वडील स्वर्ण सिंह खासगी कंपनीत नोकरी करत होते तर आई शिक्षिका होती. ग्रेसीने इंजिनिअर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.पण ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली.3 / 10आपल्या करिअरची सुरुवात 1997मध्ये छोट्या पडद्यावरील 'अमानत' या मालिकेद्वारे केली होती. यादरम्यान तिने 'लगान'साठी स्क्रिन टेस्ट दिली आणि तिची सिनेमासाठी निवड झाली. या सिनेमासह तिच्यासाठी बॉलिवूडचे मार्ग खुले झाले.4 / 10 ग्रेसीने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम केले आणि 'लगान' हिट ठरला. या सिनेमात ग्रेसीने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. या सिनेमामुळे तिच्या पदरी अनेक सिनेमांच्या ऑफर पडल्या.5 / 102003 मध्ये अजय देवगणसह 'गंगाजल' आणि 2004मध्ये संजय दत्तसह 'मुन्नाभाई MBBS'मध्ये ग्रेसीने काम केले. हे दोन्ही सिनेमे हिट ठरले. याशिवाय ती अनिल कपूर आणि प्रीती झिंटा स्टारर 'अरमान'मध्येही तिने काम केले. 6 / 10कधी काळी आमिर खानसह स्क्रीन शेअर केलेल्या या अभिनेत्रीला काम मिळत नसल्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला होता. 7 / 10'संतोषी माता' मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली. आपल्याला टिपिकल सासू-सूनांच्या भांडणावर आधारित मालिकांमध्ये रस नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. 8 / 10 ग्रेसी यशाच्या मार्गावर दिर्घ काळ चालू शकली नाही आणि बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक तिचे सिनेमे फ्लॉप व्हायला लागले. झअचानक काम मिळणे बंद झाले, करिअरमध्ये आलेल्या नैराश्यामुळेच तिने बॉलिवूड इंडस्ट्री सोडली.9 / 10 ग्रेसीनंतर अध्यात्मकडे वळली ती ब्रह्मकुमारी या संस्थेत सामील झाली. आज साध्वीसारखे जीवन जगते. ग्रेसी आता 41 वर्षांची आहे आणि तिने लग्न केले नाही ब्रम्हकुमारीसह जोडले गेल्यानंतर आता ती आध्यात्म करण्यातच आपले जीवनाचा आनंद घेणार आहे.10 / 10 सेलिब्रिटी असल्याने ब्रम्हकुमारीच्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications