'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...' By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:10 AM1 / 790 च्या दशकात आलेल्या 'हम आपके है कौन' सिनेमाने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं. सूरज बडजात्या आणि सलमान खानच्या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले त्यातलाच हा एक सिनेमा. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने त्या काळी चांगलीच कमाई केली होती. 2 / 7'हम आपके है कौन' ची गाणी तर आजही लोकप्रिय आहेत. तसंच सलमान आणि माधुरीची केमिस्ट्रीही प्रेमात पाडणारी होती. पण चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही विशेष लक्ष वेधलं होतं. ती म्हणजे अभिनेत्री रेणुका शहाणे. माधुरीलाही टक्कर देईल असं तिचं स्माईल आहे.3 / 7रेणुका या सिनेमामुळे सर्वांची लाडकी 'भाभी' बनली. पण नंतर तिला एका पाठोपाठ एक 'भाभी'च्याच वयाच्या भूमिका ऑफर होऊ लागल्याने ती वैतागली होती असा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला.4 / 7रेणुकाने केलेल्या 'भाभी'च्या भूमिकेनंतर आपली वहिनी अशीच हवी असंच तेव्हा सर्वजम म्हणायचे. कपिल शर्मा शोमध्ये कपिलही म्हणाला की त्याची भाभी जेव्हा लग्न करुन घरी आती तेव्हा त्याला प्रश्न पडायचा की ही रेणुका शहाणेंसारखं का नाही वागत आहे.5 / 7याच शोमध्ये रेणुका म्हणाली, हम आपके है कौन सिनेमानंतर मला 'भाभी'च्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या. सगळ्यांना आपल्या भावाचं लग्न माझ्याशी लावायचं होतं. रेणुका फिल्ममध्ये पायऱ्यांवरुन पडते त्या आयकॉनिक सीन बद्दलही सांगितलं.6 / 7रेणुका म्हणाली, 'दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी स्पंजच्या पायऱ्या लावल्या होत्या. ते प्रत्येक दोन मिनिटाला येऊन माझी विचारपूस करायचे. स्पंजच्या पायऱ्या असल्यामुळे मी तर तो सीन खूप एन्जॉय केला. मला वेदना होत असल्याचा अभिनय करावा लागला कारण त्या पायऱ्या खूपच मऊ होत्या.'7 / 7पूजा भाभी हे कॅरेक्टर लोकांच्या मनात असं काही बसलंय की अनेकदा लोक मला पूजा भाभी सारखं का नाही वागत असं विचारतात. तेव्हा मी सांगते की खऱ्या आयुष्यात माझा स्वभाव पूजा पेक्षा खूप वेगळा आहे. मला रागही येतो. मी त्यांना सांगते मी पूजा नाही रेणुका आहे.' आणखी वाचा Subscribe to Notifications