‘अतरंगी रे’साठी अक्षय कुमारने घेतले 27 कोटी? या आकड्यामागे आहे वेगळीच कहाणी By रूपाली मुधोळकर | Published: October 14, 2020 8:00 AM1 / 9 अक्षय कुमार सध्या ‘अतरंगी रे’ या सिनेमासाठी घेतलेल्या मानधनामुळे चर्चेत आहे. होय, या सिनेमासाठी अक्षयने किती दिवस शूटींग केले तर फक्त दोन आठवडे आणि फी घेतली किती तर 27 कोटी.2 / 9अक्षयने या सिनेमासाठी 27 कोटी मानधन घेतल्याची चर्चा कदाचित तुम्ही याआधीही ऐकली असेल. पण यामागची स्टोरी कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी.3 / 9तर या मानधनाचा संबंध अक्षयच्या ‘लकी नंबर’शी आहे. होय, 9 हा आकडा अक्षय स्वत:साठी लकी मानतो. त्यामुळे अक्षय नेहमी याच आकड्यात मानधन घेतो. 4 / 9आता कसे तर तर अक्षय कुमार साधारण एका दिवसाच्या शूटिंगसाठी साधारणत: 1 कोटी रुपये मानधन घेतो. मात्र यावेळी त्याने ही रक्कम जवळपास दुप्पट केली आहे. अक्षय कुमार 9 हा आकडा लकी मानतो. त्यामुळे मानधन सुद्धा तो याच आकड्याशी जुळणा-या संख्येने (2 +7 = 9) तो मानधन घेतो. 5 / 9‘अतरंगी रे’ या सिनेमात सारा अली खान व साऊथ सुपरस्टार धनुष हे मुख्य भूमिकेत आहेत. आनंद एल राय यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 6 / 9‘अतरंगी रे’च्या कथेबद्दल अद्याप फार माहिती मिळालेली नाही. मात्र यात अक्षय कॅमिओ रोलमध्ये असेल, असे मानले जातेय.7 / 9मिररच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात सारा अली खान डबलरोलमध्ये दिसू शकते. अक्षय व धनुष अशा दोघांसोबतही ऑनस्क्रीन रोमान्स करताना झळकू शकते.8 / 92019 मध्ये अक्षयने अनेक सिनेमे रिलीज झालेत. यंदाही त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, बेल बॉटम, बच्चन पांडे, पृथ्वीराज शिवाय अतरंगी रे. 9 / 9बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications