Join us  

रिचा चड्ढाचं मॅटर्निटी फोटोशूट, बिनधास्तपणे फ्लॉन्ट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 8:45 AM

1 / 7
रिचा चड्ढा आणि अली फजल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. रिचा आणि अली लवकरच आईबाबा होणार आहेत.
2 / 7
काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता रिचाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.
3 / 7
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या मॅटर्निटी फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4 / 7
रिचाने शर्टमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट केला आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लोदेखील पाहायला मिळत आहे.
5 / 7
अभिनेत्रीने अगदी साध्या वेशात हे मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
6 / 7
रिचा आणि अलीने २०२२ मध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं.
7 / 7
लग्नानंतर दोन वर्षांनी आता त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आईबाबा होण्यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत.
टॅग्स :रिचा चड्डाअली फजलसेलिब्रिटीप्रेग्नंसी