PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:09 PM1 / 9रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत.2 / 9या फोटोत रिचा कमालीची सुंदर दिसतेय. हातावर सजलेली अलीच्या नावाची मेहंदी ती फ्लॉन्ट करताना दिसतेय.3 / 9मेहंदी सोहळ्यासाठी रिचाने ग्रीन कलरचा लहंगा निवडला होता. त्यावर स्टायलिश पोनी आणि हेवी ज्वेलरी असा तिचा लुक होता.4 / 9मेहंदी सेलिब्रेशनदरम्यान रिचा अलीसोबत नॉटी पोझ देताना दिसली. दोघंही एकमेकांत हरवलेले दिसले.5 / 9रिचाच्या मेहंदीसाठी राजस्थानातून पाच आर्टिस्ट बोलवले होते. रिचाच्या हातावर काढण्यात आलेल्या मेहंदीमध्ये अलीचं नाव होतं. तिच्या दोन लाडक्या मांजरींचे स्केच होतं.6 / 9 रिचा आणि अली हे दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली.7 / 9अखेर 6 ऑक्टोबरला रिचा व अलीचं लग्न पार पडलं. 2 ऑक्टोबरपासून लग्नविधी सुरू झाले आणि 6 तारखेला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.8 / 92012 मध्ये फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिली भेट झाली होती.9 / 9सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये रिचा-अलीने साखरपुडा केला. फुकरे याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही रिचा व अली एकत्र झळकणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications