IN PICS : पहिला सिनेमा ऑफर झाल्यावर रितेशला काय म्हणाले होते वडील विलासराव देशमुख? By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 2:23 PM1 / 10बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख याचा आज वाढदिवस. आज रितेशनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण हा प्रवास इतकाही सोपा नव्हता. म्हणायला रितेश तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देश्मुखांचा मुलगा होता. पण पहिला चित्रपट मिळवण त्याच्यासाठी वाटतं तितकं सोप्प नव्हतं.2 / 10घरात राजकारणाचा माहोल होता. वडिल महाराष्ट्रासारख्या मोठ्या व पुढारलेल्या राज्याचे मुख्यमंत्री होते. दोन्ही भाऊ सुद्धा राजकारणाच्या वाटेवर होते. पण रितेशने स्वत:साठी वेगळी वाट निवडली. अभिनेता व्हायचा निर्णय त्यानं घेतला.3 / 10 मी अॅक्टिंग करणार,अभिनेता होणार, हा निर्णय घरच्यांना सांगणंही सोप्प नव्हतं. कारण रितेश आर्किटेक्चर होता आणि तो त्यातच करिअर करणार, हा देशमुख कुटुंबाचा अंदाज होता. पण अचानक रितेशनं अभिनय करायचं ठरवलं.4 / 10‘तुझे मेरी कसम’ या सिनेमासाठी निर्मात्यांना नवा चेहरा हवा होता. अचानक एक दिवस रितेशला फोन आला आणि तू सिनेमा करणार का? अशी थेट विचारणा झाली. एकदा भेटून तर बघू म्हणू रितेश सहज म्हणून निर्मात्यांना भेटायला गेला.5 / 10आणि त्याच भेटीस निर्मात्याने ‘डन’ केलं. पण रितेशला घरी सांगणं आवश्यक होतं. त्याने निर्मात्याकडे 15 दिवसांचा वेळ मागितला. कारण वडील मुख्यमंत्री आहेत, तेव्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय इतक्या सहज घेणं शक्य नव्हतं आणि रितेशला याची जाणीव होती.6 / 10रितेशनं सर्वप्रथम आईला सांगितलं. माऊलीनं होकार दिला. पण बाबांना तुझा निर्णय तूच सांग, असं आई म्हणाली. बाबांबद्दल आदरयुक्त भीती होतीच. पण त्यांची परवानगी गरजेची होती.7 / 10एकदिवस रितेश बाबांशी बोलला. बाबा, मला सिनेमाची ऑफर आलीये, असं एका श्वासात त्यानं सांगून टाकलं. यावर, काय निर्माता बनणार का? असं विलासरावांनी विचारलं. यावर नाही काम करायची आॅफर आहे, असं उत्तर रितेशनं दिलं.8 / 10यावर, अच्छा, हिरो होणार तर... बघ, तुला काय करायचं ते, असं विलासराव शांतपणे म्हणाले. पण रितेश कसा निर्णय घेणार? ‘बाबा, मी सिनेमा करेल. पण उद्या फ्लॉप झाला तर मला कोण काही बोलणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या मुलाने वाईट काम केलं असं म्हणतील,’असं रितेश म्हणाला.9 / 10विलासरावांनी शांतपणे रितेशचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पुढं काय म्हणाले माहितीये? ‘तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची घेतो,’ हे एकच वाक्य.10 / 10ते एक वाक्य खूप काही सांगणारं होतं. रितेशने ते आयुष्यभर लक्षात ठेवलं. आज विलासराव या जगात नाहीत. पण रितेश बाबांचं हे वाक्य कधीच विसरला नाही. इतक्या वर्षांत त्याच्या नावापुढे एकही वाद चिकटला नाही, याचं कारण कदाचित हेच असावं. आणखी वाचा Subscribe to Notifications