रितेश देशमुखचं काकांवर प्रचंड प्रेम, देशमुख कुटुंबाचे कधीही न पाहिलेले फोटो एकदा बघाच!
By मयुरी वाशिंबे | Updated: April 18, 2025 12:12 IST
1 / 11महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद (Uncle Vs Nephew Politics Rivalries Maharashtra) नवीन नाहीत. ठाकरे, पवार, मुंडे इत्यादी अनेक कुटुंबांमध्ये काका-पुतण्या वाद झालेला पाहायला मिळाला आहे. पण, महाराष्ट्रात काका-पुतण्याची एक अशीही जोडी आहे, ज्याचं एकमेंकावर प्रचंड प्रेम आहे. 2 / 11ती जोडी आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा मुलगा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh).3 / 11विलासराव यांच्या निधनानंतर दिलीपराव हेच कुटुंबाचा आधार झाले होते. त्यांनी रितेशला कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नाही.4 / 11 रितेशच्या मनात दिलीपराव यांच्यासाठी खास स्थान आहे. अनेकदा रितेशचं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि आदर दिसून आला आहे. 5 / 11काल दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस ( Diliprao Deshmukh 75th Birthday) झाला. आपल्या लाडक्या काकांच्या वाढदिवशी रितेशनं खास पोस्ट (Riteish Deshmukh Share Post For Uncle Diliprao Deshmukh) करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतचं रितेशनं देशमुख ( Deshmukh Family) कुटुंबाचे कधीही न पाहिलेले काही सुंदर फोटोही शेअर केलेत. 6 / 11 यासोबतचं रितेशनं देशमुख ( Deshmukh Family) कुटुंबाचे कधीही न पाहिलेले काही सुंदर फोटोही शेअर केलेत. 7 / 11रितेशनं काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहलं, 'प्रिय काका ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मार्गदर्शनासाठी, प्रेमासाठी आणि अढळ पाठिंब्यासाठी आम्ही नेहमीच आभारी आहोत. तुम्ही आमच्या सर्वांसाठी शक्तीचा आधारस्तंभ आहात . तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, हे आमचं भाग्य. तुम्हाला चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ, परिपूर्ण आयुष्य मिळो हीच शुभेच्छा.आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, या शब्दात रितेशनं आपल्या भावना व्यक्त केल्या. 8 / 11गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लातूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात रितेश वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाला होता. यावेळी त्यानं वडील विलासराव यांच्यासोबतच काका दिलीपराव देशमुख यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं.9 / 11तो म्हणाला होता, 'वडिलांची थोडी फार उणीव नेहमीच भासते, पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. याच्यासाठी उभे राहिले की, आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि नसली तरीही मी आहे. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो'.10 / 11'काका आणि पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे', असंही रितेश देशमुख यांनी यावेळी म्हटलं.11 / 11रितेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात काम करत आहे. या सिनेमाची निर्मिती तसंच दिग्दर्शनही तोच करत आहे.