Rohit Shetty : 35 रुपये पहिला पगार, घराचं भाडं द्यायला नव्हते पैसे; 'असा' होता रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:15 AM1 / 12बॉलिवूड फिल्ममेकर रोहित शेट्टी (Rohit Shetty) 14 मार्च रोजी 49 वर्षांचा झाला आहे. 'सूर्यवंशी', 'सिम्बा', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'सिंघम' आणि 'गोलमाल अगेन' असे सिनेमे करणाऱ्या रोहितला यशासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. संघर्ष करावा लागला आहे. 2 / 12रोहित हा फाईट मास्टर एमबी शेट्टीचा मुलगा आहे. रोहितला लहानपणापासूनच वडिलांसारखं व्हायचं होतं पण वयाच्या 11 व्या वर्षी वडिलांचं निधन झालं. घराचे भाडे देणेही अवघड होते, त्यामुळे त्याला आजीच्या घरी राहावे लागले. 3 / 12रोहितच्या आईने घर चालवण्यासाठी स्टुडिओमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. 1991 मध्ये आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडून रोहितने वयाच्या 15 व्या वर्षी कुकू कोहलीसोबत 'फूल और कांटे' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.4 / 12रोहितने सांगितले की, त्याचा पहिला पगार फक्त 35 रुपये होता. 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगण पदार्पण करत होता. या चित्रपटाच्या सेटवर रोहित आणि अजय देवगणची मैत्री झाली, जी आजही कायम आहे. 5 / 12कधी काळी 35 रुपये कमावणारा रोहित आता बॉलिवूडमधील सर्वात महागड्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी त्याची फी सुमारे 20 कोटी आहे. 2003 ते 2006 हा काळ दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीसाठी सर्वात वाईट काळ होता. 6 / 12रोहितने गोलमालच्या स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली. काम पूर्ण झाल्यानंतरही एकही अभिनेता चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता. कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसने रोहितचं कॉन्ट्रॅक्ट साईन नाही केलं. 7 / 122006 मध्ये गोलमाल रिलीज झाल्यानंतर रोहितचे नशीब पालटले. गोलमाल चित्रपटाच्या रिलीजने रोहितच्या नावावर कॉमेडी फ्रँचायझी जोडली गेली आणि त्यानंतर हिट चित्रपट देत राहिले. पण सर्कस चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 129 / 1210 / 1211 / 1212 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications