Join us

IN PICS : हे दिग्दर्शक स्टार्सपेक्षाही ‘महाग’, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 8:00 AM

1 / 13
एस.एस. राजमौली - बाहुबली आणि मगधीरा सारखे सुपरहिअ सिनेमे देणारे दिग्दर्शक एस.एस. राजमौली सर्वाधिक महागडे दिग्दर्शक आहेत. एका रिपोर्टनुसार बाहुबली या सिनेमासाठी त्यांनी 100 कोटी रूपये घेतले होते. या सिनेमाने जगभर विक्रमी कमाई केली होती.
2 / 13
संजय लीला भन्साळी - बॉलिवूडचे लार्जर दॅन लाईफ डायरेक्टर म्हणून ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी एका सिनेमासाठी जवळपास 30 ते 35 कोटी घेतात. 2010 मध्ये आलेल्या गुजारिश या सिनेमासाठी त्यांनी 27 कोटी रूपये घेतले होते.
3 / 13
मणिरत्नम - साऊथ आणि बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम एका सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी जवळपास 8 कोटी रूपये घेतात.
4 / 13
अनुराग कश्यप - अनुराग कश्यपच्या सिनेमांचा एक खास चाहता वर्ग आहे. एक सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी तो सुमारे 8 कोटी रूपये घेतो.
5 / 13
रोहित शेट्टी -मसाला आणि अ‍ॅक्शन सिनेमांसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी एका सिनेमासाठी सुमारे 25 कोटी रूपये घेतो.
6 / 13
कबीर खान- चक दे इंडिया, बजरंगी भाईजान, एक था टायगर असे सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक एका सिनेमासाठी जवळपास 8 कोटी रूपये घेतो.
7 / 13
राजकुमार हिरानी - राजकुमार हिरानी त्यांच्या ‘100 करोडी’ सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यांच्या अलीकडे आलेल्या संजू या सिनेमानेही जबरदस्त कमाई केली होती. एक सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी हिरानी 10 कोटी रूपये चार्ज करतात.
8 / 13
करण जोहर - करण जोहर रोमॅन्टिक आणि फॅमिली सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याचे बहुतेक सिनेमे हिट आहेत. अलीकडे आलेल्या त्याच्या कलंक या सिनेमाने मात्र प्रेक्षकांची निराशा केली होती. असे असले तरी एका सिनेमासाठी करण जोहर जवळपास 10 कोटी रूपये घेतो.
9 / 13
ए. आर. मुरुगदास - साऊथचा हा दिग्दर्शक हॉलिडे, स्पाइडर, सरकार अशा सिनेमांसाठी ओळखला जातो. गजनी व हॉलिडे हे त्याचे गाजलेले बॉलिवूड सिनेमे. एका सिनेमासाठी तो 12 कोटी रूपये मानधन घेतो.
10 / 13
शंकर - साऊथ इंडस्ट्रीत दिग्दर्शक शंकर यांचे मोठे नाव आहे. अक्षय कुमार व रजनीकांत यांचा 2.0 त्यांनीच दिग्दर्शित केला होता. एका सिनेमासाठी ते 15 कोटी रूपये घेतात.
11 / 13
फरहान अख्तर - फरहान अख्तर अभिनेता आहे, सोबत दिग्दर्शकही. डॉन, डॉन 2, लक्ष्य सारखे सिनेमे त्याने दिग्दर्शित केलेत. एका सिनेमासाठी तो जवळपास 4 कोटी रूपये चार्ज करतो.
12 / 13
आनंद एल राय - तनु वेड्स मनू फेम दिग्दर्शक आनंद एल राय एका सिनेमासाठी 8 ते 10 कोटी रूपये घेतात.
13 / 13
मोहित सूरी - दिग्दर्शक मोहित सूरी एका सिनेमासाठी 8 कोटी शिवाय सिनेमात 33 टक्के भागीदारी घेतो.
टॅग्स :रोहित शेट्टीएस.एस. राजमौलीबॉलिवूड