Join us

राऊडी! याडं लावतील साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचे हे झक्कास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 7:04 PM

1 / 10
साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणींच्या गळ्यातील तो ताईत आहेत.
2 / 10
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. हे फोटो पाहून तुम्हालाही याची खात्री होईल.
3 / 10
विजयच्या खात्यात अनेक सुपरहिट चित्रपट जमा आहेत. पण त्याला खरी ओळख दिली ती अर्जुन रेड्डी या सिनेमाने.
4 / 10
9 मे 1989 रोजी एका तेलगू कुटुंबात विजय देवरकोंडाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवरकोंडा गोवर्धन राव आणि आईचे नाव माधवी देवरकोंडा आहे.
5 / 10
देवरकोंडा गोवर्धन राव हे दाक्षिणात्य छोट्या पडद्यावरील कलाकार आहेत. विजय देवरकोंडाच्या धाकट्या भावाचे नाव आनंद देवरकोंडा आहे.
6 / 10
विजय देवरकोंडाचे कुटुंब त्याला राऊडी नावाने हाक मारतात. यामुळेच त्याचे चाहते त्याला राउडी देखील म्हणतात.
7 / 10
2011 साली विजयने मध्ये दक्षिण सिनेमातून पदार्पण केले. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘नुव्विला’ असे होत़े. हा मल्टीस्टारर चित्रपट होता.
8 / 10
यानंतर विजय देवरकोंडाने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. तो भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.
9 / 10
विजय देवरकोंडा चित्रपट निर्माताही आहे. हिल एंटरटेनमेंट असे त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचे नाव आहे. याच अंतर्गत त्याने गेल्या वर्षी मीकू माथ्राममे चित्ता या चित्रपटाची निर्मिती केली.
10 / 10
याशिवाय ‘राउडी वेअर’ या नावाचा त्याचा क्लोदिंग ब्रँड आहे.
टॅग्स :विजय देवरकोंडा