स्वत:चं थिएटर अन् म्युझिक बँड, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आजादची संपत्ती किती माहितीए का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 4:36 PM1 / 8सबा आजाद (Saba Azad) सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. याला कारणही तसंच आहे. हँडसम अभिनेता हृतिक रोशनसोबत (Hritik Roshan)सध्या ती हातात हात घालून फिरताना दिसते. त्यांचं अफेअर बीटाऊनमधला हॉट टॉपिक आहे.2 / 8सबा आजाद हृतिकपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. मात्र वयातील अंतर विसरुन दोघंही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात आहेत. सबा बॉलिवूडमध्ये नवीन आहे. ती नक्की कुठली आहे आणि तिच्या करिअरची सुरुवात झाली कुठून जाणून घेऊया.3 / 8सबाचा जन्म 1 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीत झाला. तिचं शालेय शिक्षण दिल्लीतच झालं. यानंतर तिने थिएटर करायला सुरुवात केली. २००८ साली तिने 'दिल कबड्डी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यामध्ये तिने राहुल बोससोबत स्क्रीन शेअर केली.4 / 8मात्र तिला खरी ओळख 2011 साली आलेल्या 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' मुळे मिळाली. याशिवाय तिने काही शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं. नुकतीच ती 'रॉकेट बॉईज' सिनेमात दिसली. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.5 / 8सबाला अभिनयासोबतच गाण्यातही रस आहे. नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत तिचा 'मॅडब्वॉय/मिंक' हा बँड आहे.सबा आजादने शाहीद कपूरच्या 'शानदार' त्यानंतर 'कारवाँ','मर्द को दर्द नही होता' सारख्या सिनेमांमध्ये आवाज दिला आहे.6 / 8सबा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. ती मध्यंतरी चर्चेत आली होती जेव्हा तिने स्वत:चं नाव बदलून सबा सिंह ग्रेवाल केल्याचा निर्णय घेतला.7 / 8सबा आजाद कमाईच्या बाबतीतही पुढे आहे. तिच्या संपत्तीविषयी सांगायचं तर २०१० मध्ये तिने स्वत:ची थिएटर कंपनी सुरु केली ज्याचं नाव 'द स्किन्स' असं ठेवलं. स्वत:च्या थिएटरमध्ये तिने 'लवप्यूक' हे पहिलं नाटक केलं होतं. 8 / 8तिची एकूण नेटवर्थ ५ ते ७ कोटी आहे. म्यूझिक बँड, थिएटर आणि चित्रपटांतून तिची कमाई होते. याशिवाय ती आजकाल अनेक जाहिरातींमध्येही दिसत असून काही ब्रँड्सना प्रमोट करते. आणखी वाचा Subscribe to Notifications