बाबो! ‘सडक 2’आधी या व्हिडीओंनीही केला आहे Dislikesचा विक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 5:00 PM1 / 8नेपोटिजमच्या मुद्यावरून नेटक-यांनी आलिया भटच्या ‘सडक 2’ या आगामी सिनेमाला लक्ष्य केले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवर नेटक-यांनी डिसलाईक्सचा अक्षरश: भडीमार केला आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरला 60 लाखांवर डिसलाईक्स मिळाले आहेत. पण लाखांवर डिसलाईक्स मिळवणारा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधीही अनेक व्हिडीओ नेटक-यांनी नापसंत केले आहेत. त्यावर एक नजर...2 / 8युट्यूब रिवाईंड 2018 - 6 डिसेंबर 2018 रोजी रिलीज झालेल्या या व्हिडीओला सुमारे 86.34 लोकांनी नाकारले होते. या व्हिडीओला 1 कोटी 80 लाख डिसलाईक मिळाले होते.3 / 8बेबी - पॉपस्टार जस्टिन बीबरचे ‘बेबी’ हे गाणे भलेही तरूणाईचे आवडते गाणे ठरले असेल. पण युट्यूबवर या गाण्याला फार पसंती मिळाली नव्हती.19 फेब्रुवारी 2010 रोजी रिलीज झालेल्या या गाण्याच्या व्हिडीओला 1 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक डिसलाईक मिळाले होते. 4 / 8युट्यूब रिवाईंड 2019 - 2018 प्रमाणेच 2019 चा हा व्हिडीओ सुद्धा युजर्सला फार आवडला नव्हता. 5 डिसेंबर 2019 रोजी रिलीज या व्हिडीओला सुमारे जळपास 90 लाख डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ७२.६९ टक्के लोकांनी या व्हिडीओला नापसंती दर्शवली होती.5 / 8बेबी शार्क डांस - हे गाणे अमेरिका आणि अन्य देशांतील मुलांचे फेवरेट सॉन्ग आहे. मात्र रिलीज झाले तेव्हा या गाण्याला 80 लाख डिसलाईक्स मिळाले होते. 6 / 8जॉनी जॉनी यस पापा - 8 ऑक्टोंबर 2016 रोजी प्रदर्शित हा व्हिडीओ खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आला होता. पण कदाचित व्हिडीओ व्हर्जन आवडले नव्हते. या व्हिडीओला सुमारे 80 लाख डिसलाईक मिळाले होते.7 / 8प्युडीपायचा कॅन धिस व्हिडीओ गेट्स वन मिलियन डिसलाईक - हा व्हिडीओ तयार करणा-या प्युडीपायला खरे तर डिसलाईक्सचा विक्रम करायचा होता. झालेही तसेच युट्यूबवरील 93 टक्के नेटकºयांना हा व्हिडीओ डिसलाईक्स केला होता.8 / 8इट्स एव्हरीबडी ब्रो फिट टीम 10 - हे गाणे 2017 मध्ये रिलीज झाले होते. हा व्हिडीओ 40 लाखांवर लोकांनी नापसंत केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications