"पहिल्या डेटनंतर सैफ २ दिवस अमृताच्या घरीच..." बॉलिवूडच्या चर्चेतील कपलचा इंटरेस्टिंग किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 2:59 PM1 / 8मनोरंजनविश्वात अनेक अशा जोड्या आहेत ज्यांचा शेवट वेगळा झाला. घटस्फोट, ब्रेकअप हे तर सिनेसृष्टीत कॉमनच आहे. तसंच दोघांच्या वयातील अंतर हा आणखी एक वादाचा मुद्दा कायम असतोच. बॉलिवूडमधलं असंच एक चर्चेतलं कपल म्हणजे सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह (Amrita Singh).2 / 8सैफ अली खान सुरुवातीपासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अमृता सिंगसोबतची त्याची लव्हस्टोरी तर कायम चर्चेचा विषय. त्यांच्या डेटिंगचे किस्से तर हैराण करणारे आहेत. पहिल्याच डेटनंतर सैफ दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता.3 / 8सैफ आणि त्याची एक्स वाईफ अभिनेत्री अमृता सिंहची ओळख एका फोटोशूटदरम्यान झाली होती. फिल्ममेकर राहुल रवैलच्या फिल्ममधून सैफ डेब्यू करणार होता. अमृता राहुलची चांगली मैत्रिण असल्याने त्याने तिलाही स्टारकास्ट सोबत फोटोशूटसाठी बोलावले होते. तेव्हा सैफ आणि अमृताची पहिल्यांदा ओळख झाली. तेव्हा सैफ बघताच क्षणी अमृताच्या प्रेमात पडला होता.4 / 8काही वर्षांपूर्वी सैफ आणि अमृताने सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अमृताने त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल दिलखुलासपणे चर्चा केली होती. सैफने अमृताला डिनरचे आमंत्रण दिले होते. मात्र अमृताला फारसं बाहेर जाणं पसंत नव्हतं म्हणून तिने सैफला घरीच जेवायला यायचं आमंत्रण दिलं होतं.5 / 8सैफ अमृताच्या घरी पोहोचला. तिथे त्याने अमृताला बिना मेकअप बघितलं.तिच्या सौंदर्यावर तो भाळला. तिच्या घरी तो २ दिवस राहिला होता. दोघांमध्ये ओळख वाढली. एकाच घरात राहूनही दोघींही वेगवेगळ्या खोलीत झोपायचे.6 / 8सैफ आणि अमृताने 1991 साली लग्नगाठ बांधली. तेव्हा दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर होतं. सैफ फक्त २१ वर्षांचा होता तर अमृता ३३ वर्षांची होती. दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलंही झाली. मात्र काही काळानंतर सैफ आणि अमृताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.7 / 82004 साली सैफ आणि अमृताने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी सिनेसृष्टीत वाऱ्यासारखी पसरली. बहुचर्चित असलेल्या लव्हस्टोरीचा अंत झाला. 8 / 8घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी सैफ अली खानने अभिनेत्री करिना कपूर खानसोबत लग्न केलं. तर अमृता मात्र सिंगल मदर राहून तिने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. आणखी वाचा Subscribe to Notifications