Join us

Salman Khan : सलमान खानच्या आयुष्यातील 'ती' 3 वर्षे; एक-दोन नव्हे सलग 8 चित्रपट झाले फ्लॉप अन् अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 10:59 AM

1 / 11
'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या यशानंतर सलमान खानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही त्यांच नाव इंडस्ट्रीत फक्त एक यशस्वी अभिनेता म्हणून घेतले जाते. पण सलमान खानच्या चित्रपटाचा ग्राफ काळाबरोबर वर-खाली होत राहिला, पण त्याने कधीही आपल्या कामातून ब्रेक घेतला नाही.
2 / 11
सलमानने कारकिर्दीत असाही काळ पाहिला जेव्हा एक-दोन नव्हे तर सलग आठ चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत असतात. त्याच्या करिअरमध्ये त्याने आता अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यांनी करोडोंची कमाई केली आहे.
3 / 11
अभिनेत्याच्या आयुष्यात अशीही एक वेळ आली जेव्हा त्याचे चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरले. 2005 ते 2008 पर्यंत सलमानचे एक, दोन नव्हे तर सलग 8 चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर डेव्हिड धवनच्या एका चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली.
4 / 11
सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. बऱ्याच संघर्षानंतर हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठू शकला. सलमानसोबत ही पहिलीच वेळ नसली तरी. त्यांच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.
5 / 11
2005 हे वर्ष सलमान खानसाठी खूप वाईट ठरले. याआधी सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत होते. सलमान खान आणि बी-टाऊन सुपरस्टार करीना कपूर खान यांचा 'क्यूंकी' चित्रपट प्रदर्शित झाला. सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर सलमान खानच्या फ्लॉप चित्रपटांची मालिका तीन वर्षे सुरू राहिली.
6 / 11
2006 साली रिलीज झालेला सावन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात सलमान एका वेगळ्या रुपात दिसला होता. त्याचा लांब केसांचा लूकही प्रेक्षकांना आवडला नाही. 2006 साली रिलीज झालेला सावन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.
7 / 11
सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा स्टारर चित्रपट जान-ए-मन 2006 साली प्रदर्शित झाला होता. लव्ह ट्रँगल असलेला हा चित्रपट कोणालाच आवडला नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरला.
8 / 11
2007 मध्ये आलेला सलमानचा सलाम-ए-इश्क हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपट पडला.
9 / 11
2008 मध्ये सलमान खानचे तीन सिनेमे रिलीज झाले होते, त्यापैकी एक होता गॉड तुस्सी ग्रेट हो, हीरोज आणि युवराज. एका वर्षात सलमानने चाहत्यांसाठी तीन चित्रपट आणले, मात्र तिन्ही चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरले.
10 / 11
8 बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर सलमान खानचे नशीब दिग्दर्शक डेव्हिड धवनच्या 'पार्टनर' या कॉमेडी चित्रपटाने बदललं. सलमान आणि सुपरस्टार गोविंदाचा 'पार्टनर' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला,
11 / 11
भाईजानने या चित्रपटानंतर मागे वळून पाहिले नाही आणि 'वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, रेडी, एक था टायगर' असे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूड