बिग बी ते हृतिक रोशन! बॉलिवूडच्या 'या' ४ सुपरस्टार्सचा इनकम टॅक्स वाचून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 2:54 PM1 / 10अक्षय कुमार - बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या सर्वाधिक इनकम टॅक्स भरल्यामुळे चर्चेत आहे.2 / 10अक्षयने यावर्षी २९.५ कोटींचा टॅक्स भरला असून सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी म्हणून तो चर्चेत आला आहे. अक्षयने वर्षभरात केवळ ५-६ चित्रपट केले आहे. इतकंच नाही तर त्याने पृथ्वीराज या चित्रपटासाठी ६० कोटी रुपये फी घेतल्याचं सांगण्यात येतं.3 / 10अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे मेगास्टार, शहेनशहा, बिग बी अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आजवरच्या कारकिर्दीत बिग बींनी असंख्य चित्रपट केले असून एका चित्रपटासाठी ते फी देखील तितकीच मोठी घेतात.4 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बींनी २०१८-१९ या वर्षात ७० कोटी रुपये टॅक्स भरला होता.5 / 10सलमान खान- बॉलिवूडचा दबंग खान त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. सलमानदेखील एका चित्रपटासाठी मोठी रक्कम आकारतो.6 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान प्रत्येक वर्षी ४४ कोटींच्या आसपास इनकम टॅक्स भरतो.7 / 10शाहरुख खान- दमदार अभिनयशैलीमुळे चर्चेत येणारा शाहरुख चित्रपटांव्यतिरिक्त प्रोडक्शन हाऊस वा अन्य उद्योगांमधूनही कमाई करतो.8 / 10शाहरुख वर्षाला जवळपास २२ कोटींचा टॅक्स भरतो.9 / 10हृतिक रोशन - बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशनची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. यावेळी तो इनकम टॅक्समुळे चर्चेत आला आहे.10 / 10हृतिक प्रत्येक वर्षी २५.५ कोटी रुपयांचा टॅक्स भरतो. आणखी वाचा Subscribe to Notifications