Salman Khan: मराठेशाहीच्या धगधगत्या पर्वाचा सिनेमा, बॉलिवूडच्या दबंगची हजेरी By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 11:53 AM1 / 10मराठेशाहीतील शौर्याचं धगधगतं पर्व असलेल्या सात मराठा सरदारांनी केलेल्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रवीण तरडे, सत्या मांजरेकर, जय दुधाणें, हार्दिक जोशी, विराट मडके, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. पुढील महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार असून, पुढच्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2 / 10प्रवीण तरडे, सत्या मांजरेकर, जय दुधाणें, हार्दिक जोशी, विराट मडके, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. पुढील महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार असून, पुढच्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 3 / 10मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची घोषणा करण्यात आली. 4 / 10याशिवाय उदय सामंत आणि प्रताप सरनाईकही या सोहळ्याला उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी नारळ वाढवला, तर ठाकरे यांनी क्लप दिला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची कथा महेशने पाच वर्षांपूर्वी ऐकवली होती. तेव्हाच त्याचे भव्य चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते. 5 / 10आज मराठी सिनेमा कात टाकतोय आणि पुढे जातोय. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण आहे? असा प्रश्न राज यांनी मांजरेकर यांना विचारल्यावर अक्षय कुमार समोर आला. आपण शिवाजी महाराज साकारत असल्याचे अक्षयने सांगितले.6 / 10अक्षय कुमार म्हणाला की राज ठाकरे यांच्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. प्रथमच मराठी सिनेमात काम करत असून महेश मांजरेकर यांच्या सोबतही काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 7 / 10जबाबदारी खूप मोठी असल्याचेही अक्षय म्हणाला. सात वर्षांपूर्वी 7 या नावाने घोषित केलेल्या या सिनेमाला अखेर आज खऱ्या अर्थाने सुरुवात होत असल्याचे महेश मांजरेकर म्हणाले.8 / 10या शुभारंभ सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आवर्जुन उपस्थित होते. तर, अक्षयकुमारचा दोस्त आणि बॉलिवूडचा दबंग सलमान खानही हजर होता. मात्र, सलमान खान व्यासपीठावर कुठेही दिसला नाही. 9 / 10काळ्या रंगातील शर्ट परिधान केलेला सलमान या सोहळ्याला उपस्थित होता. त्यावेळी, चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, महेश मांजरेकर यांनीही सलमानसोबत पोज घेत सेल्फी काढला.10 / 10'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सिनेमा मराठीसह हिंदी आणि तेलुगू मध्येही बनणार आहे. या सिनेमात प्रवीण तरडे, सत्या मांजरेकर, जय दुधाणें, हार्दिक जोशी, विराट मडके, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम मुख्य भूमिकेत आहेत. पुढील महिन्यात याचे शूट सुरू होणार असून, पुढल्या दिवाळीला रिलीज होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications