Samantha Ruth Prabhu Befitting Reply to Trollers: "माझ्यावर टीका करण्यापेक्षा..."; Bold Photoshoot वरून ट्रोल करणाऱ्यांची समंथाने घेतली शाळा; Instagram Story पोस्ट करत दिलं सणसणीत उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 8:09 PM
1 / 10 Samantha Ruth Prabhu Bold Photoshoot, Befitting Reply to Trollers : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं. तिच्या या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली. 2 / 10 समंथाने केलेल्या फोटोशूटमधील तिचा पेहराव खूपच बोल्ड असल्याच्या भावना चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या. मात्र तिच्या पोशाखावरून टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर तिने जोरदार प्रहार केला. 3 / 10 महिलांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांना सहज कसं 'जज' केलं जातं, यावर भाष्य करताना नाराजीपर एक मोठी पोस्ट लिहीली. 4 / 10 स्त्रियांना त्यांच्या हेमलाइन्स आणि नेकलाइन्सच्या आधारे जज करण्याऐवजी स्वतःची विचारधारा सुधारा, असं सणसणीत उत्तर तिने ट्रोलर्सना दिलं. 5 / 10 'एक स्त्री म्हणून, जज करणं काय असतं याची मला नीट माहिती आहे. स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत, त्यांचा वंश, शिक्षण, सामाजिक स्थान, देखावा, त्वचा टोन अशा गोष्टींवर त्यांना जज केलं जातं' 6 / 10 'एखादी व्यक्ती केवळ त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवर तिला जज करणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे. आता आपण २०२२ मध्ये आहोत. त्यामुळे स्त्रीला हेमलाइन्स आणि नेकलाइन्सच्या आधारे जज करणं थांबवायला हवं' 7 / 10 'दुसऱ्यांना असं जज करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगले बनविण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो का? याचा सर्वांनी विचार करा' 8 / 10 'स्वत:ला सुधारणं आणि आपण स्वत: काय बोलतोय त्याचं आत्मचिंतन करणं याला खऱ्या अर्थाने क्रांती घडवणं म्हणतात.' 9 / 10 तुमचे आदर्श इतरांवर थोपवणं आणि त्यानुसार माणसांना जज करणं यामुळे आजवर कोणाचंही भलं झालेलं नाही. आपण एखाद्या व्यक्तीला ज्या प्रकारे मोजतो आणि समजून घेतो त्याप्रमाणे आपण हळूवारपणे पुन्हा लिहूया,' समंथाची पोस्ट वाचली. 10 / 10 सर्व फोटो सौजन्य - Instagram / Samantha Ruth Prabhu आणखी वाचा