Join us  

सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 9:00 PM

1 / 8
Samantha Photoshoot, Woman of the Year Award: साऊथमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिंदीतही आपली वेगळी छाप पाडताना दिसतेय.
2 / 8
ती सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल: हनी बनी' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारी ही मालिका प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
3 / 8
याच दरम्यान सौंदर्यवती समंथा हिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी विविध रंगांच्या ड्रेसमधील जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
समंथाने 'सिटाडेल: हनी बनी'साठी अनेक प्रमोशनल लूक केले होते. त्यानंतर आज तिने एका अवार्ड शो मधील तिचा लूक आणि फोटोशूट शेअर केला आहे.
5 / 8
आयफा उत्सवम या अवॉर्ड शो सोहळ्यात समंथाने एक खास लूक केला. तिने स्कीन फिट हिरव्या रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला.
6 / 8
समंथाचा हा स्पेशल 'हॉट लूक' तिच्या इन्स्टाग्राम फॅमिलीतील ३५.९ मिलीयन फॉलोअर्सना नक्कीच सौंदर्याची मोहिनी घालणारा आहे.
7 / 8
समंथाने या फोटोशूटमध्ये अतिशय स्टाइलिश पोशाख केला आहे. तसेच तिने या लूकसाठी हलका मेकअप केला असल्याने तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून येत आहे.
8 / 8
आयफा उत्सवम अवार्ड शो मध्ये समंथाला यंदाच्या वर्षीची सर्वोत्तम महिला म्हणजेच Woman of the Year पुरस्कार मिळाला असून त्या सोहळ्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ( फोटो सौजन्य: समंथा रूथ प्रभू इन्स्टाग्राम आणि सोशल मीडिया )
टॅग्स :समांथा अक्कीनेनीबॉलिवूड