"आम्ही पाकिस्तानी सानियासोबत आहोत", शोएब मलिकबरोबर फोटो शेअर करताच ट्रोल झाली सना जावेद By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 5:24 PM1 / 11पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी निकाह करत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. शनिवारी(२० जानेवारी) सनाशी लग्न करत शोएबने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.2 / 11गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. सानियाने शोएबबरोबरचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. 3 / 11शोएबबरोबर लग्न केल्यानंतर आता सना जावेदने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. सनाने शोएबबरोबरचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. 4 / 11पण, यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनेकांनी सनाच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. 5 / 11एकाने कमेंट करत 'आम्ही पाकिस्तानी सानिया मिर्झासोबत आहोत. तिच्यासमोर तू काहीच नाहीस,' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने 'उमर जैसवालसोबतही हिने असंच फोटोशूट केलं होतं,' अशी कमेंट केली आहे. 6 / 11'एवढ्या प्रामाणिक पत्नीबरोबर हा राहू शकला नाही. तुझ्याबरोबर काय राहणार', असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. 7 / 11'हिला वाटतंय हा तिच्यावर प्रेम करेल...पण, त्याला स्वत:च्या बायकोलाही प्रेम देता आलं नाही', अशी कमेंटही केली आहे. तर एकाने 'जास्त फोटो अपलोड करू नकोस...नंतर परत तुलाच डिलीट करावे लागतील,' असंही म्हटलं आहे. 8 / 11'सानियासाठी वाईट वाटतंय', अशी कमेंटही एकाने केली आहे. 9 / 11सना जावेद एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. शोएबआधी सनाने उमर जयस्वालसोबत निकाह केला होता. 10 / 11२०२० मध्ये सनाने पाकिस्तानी गायक असलेल्या उमरबरोबर संसार थाटला होता. परंतु, शोएबसोबत सूर जुळल्यानंतर तिने उमरबरोबर तलाक घेतला. 11 / 11तर शोएबचं हे तिसरं लग्न आहे. त्याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत २०१०मध्ये निकाह केला होता. सानियाआधी शोएबने भारतीय असलेल्या आयेशासोबत निकाह केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications