Join us

'ठाकूर'च्या भूमिकेसाठी संजीव कुमार नव्हते पहिली पसंती, 'शोले'साठी त्यांनी घेतले होते बिग बींपेक्षा जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 2:42 PM

1 / 9
१९७५ सालातील चित्रपट, ज्याचे आयकॉनिक डायलॉग आजही ऐकायला मिळतात. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरी लोक अजूनही त्या चित्रपटाची कथाच नव्हे तर चित्रपटातील गाणीही गुणगुणताना दिसतात. ७०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षातील इतर सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले.
2 / 9
तुम्हाला माहीत आहे का की संजीव कुमार या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. इतकंच नाही तर त्यांना स्वतःला 'ठाकूर'चं पात्र साकारायचं नव्हतं. मात्र, नंतर जेव्हा त्यांना 'ठाकूर'ची भूमिका मिळाली तेव्हा त्यांनी या व्यक्तिरेखेत जीव ओतला पण मानधनाच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले.
3 / 9
गब्बर, जय-वीरू, बसंतीपासून ते 'शोले'च्या ठाकूरपर्यंत अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्यांना लोक विसरलेले नाहीत. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजीव कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने मल्टीस्टारर चित्रपट सजला होता. मात्र या चित्रपटासाठी संजीव कुमार यांच्याऐवजी अन्य दिग्गज कलाकाराला चित्रपटात कास्ट करायचे होते. विशेष म्हणजे खुद्द संजीव कुमार यांनाही ही भूमिका करायची नव्हती.
4 / 9
'ठाकुर न झुक सकता है, ना टूट सकता है, ठाकुर सिर्फ मर सकता है...' या सारख्या डायलॉगला आयकॉनिक बनवणाऱ्या अभिनेते संजीव कुमार यांना 'गब्बर'ची भूमिका साकारायची होती. पण, रमेश सिप्पी यांनी 'गब्बर'च्या भूमिकेसाठी अमजद खान यांना फायनल केले होते.
5 / 9
'ठाकूर'च्या भूमिकेसाठी पहिली पसंती संजीव कुमार नसून दिलीप कुमार होते, पण दिग्गज अभिनेत्याने ही भूमिका नाकारली. ही भूमिका नाकारल्याबद्दल दिलीप कुमार यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये अनेकदा दिलगिरी व्यक्त केली आहे.
6 / 9
मात्र, संजीव कुमार यांनी ठाकूरच्या भूमिकेला होकार दिला आणि त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. १९७५ चा हा क्लासिक हिट चित्रपट २-३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. नंतर या चित्रपटाने जगभरात ५० कोटी रुपयांची कमाई केली. तसेच या चित्रपटाने असा इतिहास रचला होता की आजही नवीन चित्रपट या चित्रपटाचे अनेक विक्रम मोडू शकलेले नाहीत.
7 / 9
चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या सलीम खान आणि जावेद अख्तर या लेखकांच्या जोडीलाही १० हजार रुपये फी देण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात 'ठाकूर बलदेव सिंह'ची भूमिका साकारण्यासाठी संजीव कुमार यांना १ लाख २५ हजार रुपये मिळाले होते.
8 / 9
चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या सलीम खान आणि जावेद अख्तर या लेखकांच्या जोडीलाही १० हजार रुपये फी देण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात 'ठाकूर बलदेव सिंह'ची भूमिका साकारण्यासाठी संजीव कुमार यांना १ लाख २५ हजार रुपये मिळाले होते.
9 / 9
तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण अमिताभ बच्चन यांना 'जय'च्या भूमिकेसाठी संजीव कुमार यांच्यापेक्षा कमी मानधन मिळाले होते. या पात्रासाठी त्यांना फक्त एक लाख रुपये मिळाले.
टॅग्स :संजीव कुमारअमिताभ बच्चन