Join us

Saqib Saleem on Virat Kohli : एकेकाळी विराट कोहलीसोबत खेळायचा क्रिकेट, अभिनेत्याला Kiss केल्यामुळे आला होता चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:13 IST

1 / 10
सध्या असा एक अभिनेता चर्चेत आहे, ज्यानं क्रिकेट सोडलं आणि बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली.
2 / 10
दिल्लीचा रहिवासी असलेल्या या अभिनेत्यानं विराट कोहलीसोबत क्रिकेटच्या मैदानावर षटकार चौकार आणि षटकारही मारले आहेत.
3 / 10
अभिनेता कोण आहे, तुम्ही त्याला ओळखलात का? तर हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर साकिब सलीम (Saqib Saleem) आहे.
4 / 10
साकिब सलीमनेही अभिनयाच्या जगात आपला यशस्वी ठसा उमटवला आहे. पण, ग्लॅमरच्या जगात येण्यापूर्वी साकिब क्रिकेट खेळायचा हे फार कमी लोकांना माहिती असेल.
5 / 10
साकिब लहान असताना राज्यस्तरीय क्रिकेटपटू होता. साकिबने स्वतः खुलासा केला होता की, तो जम्मू आणि काश्मीरसाठी क्रिकेट खेळला आहे.
6 / 10
विराट (Virat Kohli) आणि साकिबची ओळख बालपणापासून आहे.
7 / 10
साकिब (Saqib Saleem) क्रिकेट सोडून मुंबईत आला. 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट यशस्वी झाला आणि तो स्टार बनला.
8 / 10
यानंतर साकिबने (Saqib Saleem) '८३', सलमान खानच्या 'रेस ३' व्यतिरिक्त 'मेरे डॅड की मारुती', 'बॉम्बे टॉकीज' आणि 'ढिशूम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
9 / 10
साकिब सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. चाहते अभिनयाव्यतिरिक्त साकिब सलीमच्या त्याच्या लूक आणि स्टाईलचेही वेडे आहेत.
10 / 10
साकिब सलीम हा प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीचा सख्खा भाऊ आहे.
टॅग्स :साकिब सलीमविराट कोहलीरणदीप हुडाबॉलिवूड