Join us

सारा- कार्तिकने एकमेकांना केले ‘अनफॉलो’...! हे कपल्सही याचमुळे आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 8:00 AM

1 / 9
सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. अशात एखाद्या सेलिब्रिटीने एखाद्याला अनफॉलो करताच चर्चांना ऊत येतो. ब्रेकअपनंतर एकमेकांना अनफॉलो करणाºया अशाच काही कपल्सबद्दल...
2 / 9
सारा अली खान-कार्तिक आर्यन : सारा व कार्तिकच्या प्रेमाच्या चर्चा मध्यंतरी जोरात होत्या. पण आताश: दोघांचे ब्रेकअप झालेय. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचेही कळतेय. सध्या याचीच जोरदार चर्चा आहे.
3 / 9
अनुष्का शर्मा-विराट कोहली : आज अनुष्का व विराट आनंदी कपल आहे. मात्र लग्नाआधी एकमेकांना डेट करत असताना एका कारणावरून दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.
4 / 9
पुलकीत सम्राट - यामी गौतम : एकेकाळी पुलकीत व यामी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.
5 / 9
विकी कौशल-हरलीन सेठी : विकी कौशल कधीकाळी हरलीन सेठीच्या प्रेमात होता. मात्र ब्रेकअप झाले तसे दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले.
6 / 9
नेहा कक्कर- हिमांश कोहली : नेहा व हिमांशचे नात्यावर बरीवाईट चर्चा झाली. या दोघांनी ब्रेकअपनंतर एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.
7 / 9
मौनी रॉय - मोहित रैना : मौनी व मोहित राय यांनी जाहीरपणे कधीही प्रेमाची कबुली दिली नाही. पण त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु असतानाच दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.
8 / 9
करण ठक्कर- क्रिस्टल डिसूजा : करण व क्रिस्टलची जोडी चर्चित जोडींपैकी एक होती. दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.
9 / 9
सृष्टी रोडे-मनीष नागदेव - बिग बॉस 12 संपताच अभिनेत्री सृष्टी रोडेने तिचा साखरपुडा तोडला होता. यानंतर सृष्टी व मनीष यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.
टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन