कधी महाकाल, कधी केदारनाथ... सारा अली खान इतकं देवदर्शन का करते? जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 3:33 PM1 / 8सारा अली खान आता केवळ सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक नाही. तर तिची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. सारा आज घडीला बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.2 / 8सारा मोठी स्टार आहे, पण अद्याप तरी तिचे पाय जमिनीवर आहे. विनम्र अभिनेत्री म्हणून ती बॉलिवूडमध्ये परिचित आहे. सारा प्रचंड श्रद्धाळू आहे. अनेकदा ती देवदर्शन करताना दिसते.3 / 8कधी गुरूद्वारा, कधी मशीदीत, कधी मंदिरात सारा देवदर्शन घेताना दिसते. यावरून अनेकदा ती ट्रोलही होते. पण साराला याची पर्वा नाही. कारण यामागे तिची स्वत:ची कारण आहेत. स्वत:ची श्रद्धा आहे.4 / 8दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत साराला याबद्दल विचारलं गेलं. तू वेगवेगळ्या मंदिरात जातेय, यामागचं नेमकं कारण काय? असं तिला विचारलं गेलं. यावर साराने खुलासा केला.5 / 8यावर ती म्हणाली, मी धार्मिक आहे म्हणून मंदिरात जात नाही तर आध्यात्मिक आहे म्हणून मी जाते. मला ती पवित्र ऊर्जा आवडते. मग ती गुरद्वारातून मिळो की मंदिरातून किंवा मग सेटवरच्या लोकांकडून. मला लोकांकडून पॉझिटीव्ह एनर्जी मिळते आणि यामुळेच मी कधी मंदिरात जाते तर कधी दरग्यात. 6 / 8साराला भटकंती करायला मुळातच आवडते आणि यादरम्यान ती धार्मिक ठिकाणी जाणं पसंत करते. गेल्या काही दिवसांत केदारनाथपासून महाकाल, आसामच्या कामाख्या मंदिरात ती गेली.7 / 8राजस्थानच्या मेवाडस्थित श्री एकलिंग नाथजी मंदिरात ती गेली. उदयपूरच्या नीमच माता मंदिरातही तिने पूजाअर्चना केली. यासाठी अनेकांनी तिच्यावर टीका केली.8 / 8मंदिराला भेटी देणा-या साराने तिच्या पुढचे ‘खान’ हे आडनाव काढून टाकावं, अशा शब्दांत ट्रोलर्सने तिच्यावर टीका केली. आणखी वाचा Subscribe to Notifications