Join us

'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 10:43 AM

1 / 9
यारो के यार सतीश कौशिक यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या केवळ ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.
2 / 9
सतीश कौशिक यांनी कधीच मुख्य हिरो म्हणून काम केले नसले त्यांनी सहाय्य्क भूमिका साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यांच्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले.
3 / 9
त्यांच्या अभिनयाचे लोक इतके चाहते होते की त्यांच्यासमोर मुख्य अभिनेताही फिका पडेल. सिनेमात हिरो बदलत होते पण एक नाव कधीच बदलायचं नाही आणि ते सतीश कौशिक होते. त्यांचा छोट्यातला छोटा जरी रोल असला तरी तो महत्वाचा असायचा.
4 / 9
आपल्या २ मिनिटांच्या परफॉर्मंसनंतरही प्रेक्षकांच्या मनावर कसे अधिराज्य गाजवायचे हे त्यांना चांगलंच माहित होतं. म्हणूनच त्यांची प्रत्येक भूमिका ही कायम लक्षात राहण्यासारखीच आहे.
5 / 9
सतीश कौशिक यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. सलमान खानच्या तेरे नाम पासून कागज, कर्ज, रुप की रानी, छत्रीवाली, मिस्टर इंडिया, हमारा दिल आपके पास है, मिलेंगे मिलेंगे, साजन चले ससुराल, बधाई हो बधाई सारख्या अनेक चित्रपटात त्यांनी आपले टॅलेंट सिद्ध केले.
6 / 9
केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर ते दिग्दर्शक, निर्माते, स्क्रीप्ट रायटर, कॉमेडियन म्हणूनही लोकप्रिय ठरले. त्यांच्या सिनेमात अनिल कपूर, श्रीदेवी सारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका केल्या. तुम्हाला माहितीए का सलमान खानचा सुपरहिट सिनेमा 'तेरे नाम' सतीश कौशिक यांनीच दिग्दर्शित केला होता.
7 / 9
कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'सिनेमातही त्यांची भूमिका आहे. तर नुकत्याच रिलीज झालेल्या रकुल प्रीतच्या छत्रीवाली सिनेमात ते दिसले होते. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कंगनानेही भावूक पोस्ट केली आहे.
8 / 9
'साजन चले ससुराल' आणि 'राम लखन' या सिनेमातील भूमिकांसाठी सतीश कौशिक यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. तर 'कागज' सिनेमातील त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्डने सम्मानित करण्यात आले होते.
9 / 9
सतीश कौशिक यांच्या निधनाने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पोकळी निर्माण झाली आहे. एक हरहुन्नरी विनोदी अभिनेता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.
टॅग्स :सतीश कौशिकसिनेमाबॉलिवूडमृत्यू