ग्लॅमर जगताला अलविदा करत या अभिनेत्रीनं घेतला संन्यास, बनली बौद्ध भिक्षू By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 10:53 AM1 / 12मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेनला टक्कर देणारी अभिनेत्रीने कलाविश्व सोडून साध्वी बनलीय. या अभिनेत्रीने अक्षय कुमारसोबतही काम केलंय. आम्ही बोलतोय, अभिनेत्री बरखा मदानबद्दल.2 / 12ही गोष्ट आहे १९९४ सालची. त्यानंतर सुश्मिता सेनने मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती आणि ऐश्वर्या दुसऱ्या स्थानावर होती. सुश्मिताने मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले तर ऐश्वर्या मिस वर्ल्ड स्पर्धेत फर्स्ट रनर अप म्हणून गेली. या दोन्ही नायिकांनी भारतासाठी मुकुट पटकावला. याच मिस इंडिया स्पर्धेतील दुसरी उपविजेती बरखा मदान होती. 3 / 12त्यानंतर बरखाने मिस टुरिझमचा किताब पटकावला. त्यानंतर ती इंटरनॅशनल मिस टुरिझम स्पर्धेत गेली पण ती थर्ड रनर अप राहिली.4 / 12यानंतर १९९६ मध्ये बरखा मदानने 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा तोच चित्रपट होता ज्यात अक्षय कुमारने अंडरटेकरसोबत भांडण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.5 / 12भूत, समय, तेरा मेरा प्यार, सोच लो आणि सरखाब या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. इतकंच नाही तर ती साथ फेरे, न्याय, सुरग, नवीन आणि घर एक सपना या टीव्ही शोमध्येही दिसली होती.6 / 12बरखाच्या शेवटच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर २०१२ मध्ये रिलीज झालेला 'सुरखाब' हा तिचा शेवटचा चित्रपट होता.7 / 12बरखा मदान पंजाबी कुटुंबातून आहे. २०१२ मध्ये तिने बौद्ध धर्माचे पालन करण्याचा निर्णय घेतला. ती दलाई लामा यांची अनुयायी आहे. 8 / 12बरखा अनेकदा धर्मशाळेत दिसते. ती बुद्ध गयाच्या तारा चिल्ड्रन प्रोजेक्टशी देखील संबंधित आहे जी एचआयव्ही बाधित मुलांची सेवा करते.9 / 12बरखा मदानचे सध्याचे आयुष्य सोशल मीडियावर पाहायला मिळते. ती आता एका मठात राहते ती तिचा प्रवास सोशल मीडियावर शेअर करते. जिथे ती साध्या कपड्यात दिसत आहे. 10 / 12एकेकाळी ग्लॅमरस दिसणारी ही अभिनेत्री आता दोन जोड्या कपडे आणि साध्या चप्पलमध्ये दिसत आहे. तसेच ती सोशल मीडियावर आपले विचारदेखील मांडताना दिसते.11 / 12बरखा मदनने साध्वी बनण्याचा निर्णय केव्हा आणि का घेतला, असा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. तर २००२ साली तिने हिमाचलमधील धर्मशाला येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दलाई लामा जोपा रिपोंचे यांची भेट घेतली. खरे तर त्यावेळी तिने त्यांचे प्रवचन ऐकले आणि साध्वी होण्याचा विचारही तिच्या मनात आला. 12 / 12बरखाने स्वतः साध्वी होण्याचे कारण सांगितले होते. आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, पण काही गोष्टी मागे राहिल्यासारखं वाटत होते, असे तिने म्हटले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications