Scam 1992: 'इश्क है तो रिस्क है' म्हणत हर्षद मेहता बनला शेअर मार्केटचा हिरो आणि व्हिलनसुद्धा, त्याचे टॉप १० डायलॉग्स By तेजल गावडे | Published: October 20, 2020 2:51 PM1 / 10प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ ही वेबसिरीज सध्या खूप चर्चेत आहे. ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. 2 / 10स्कॅम १९९२ ही वेबसीरिज सत्यघटनेवर आधारित असून स्टॉक मार्केटचा अमिताभ बच्चन समजल्या जाणाऱ्या हर्षद मेहता याच्यावर आधारित आहे.3 / 10 ज्यामुळे पुन्हा एकदा त्याचे नाव प्रकाशझोतात आले आहे.4 / 10आपल्याकडच्या आलिशान कार, भरमसाठ संपत्ती आणि पंतप्रधानांवर लाच घेतल्याचा आरोप केल्यामुळे नेहमीच विशेष चर्चेत असणाऱ्या हर्षद मेहताला स्टॉक मार्केटचा बादशाह म्हटले जायचे.5 / 10हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकरवर बनलेली ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आणि लोकांना आवडली.6 / 1080 व 90 च्या दशकात एका घोटाळ्याने अख्खा शेअर बाजार हादरला होता. 7 / 105 हजार कोटींच्या या घोटाळ्याने हर्षद मेहता हे नाव चर्चेत आले होते.8 / 10शून्यातून हिरो आणि हिरोचा विलेन बनलेल्या याच हर्षद मेहता नामक व्यक्तिची सत्यकथा या बेवसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.9 / 1080-90 दशकात फक्त 40 रूपये घेऊन हर्षद मेहता मुंबईत येतो आणि बघता बघता शेअर बाजाराचा ‘बिग बुल’ बनतो आणि पुढे हाच ‘बिग बुल’ 5 हजार कोटींचा घोटाळा करून लोकांच्या नजरेत खलनायक ठरतो, त्याची ही कथा.10 / 10देबाशीष बसू आणि सुचेता दलाल यांच्या ‘द स्कॅम’ या पुस्तकावर ही वेबसीरिज आधारित आहे. प्रतिक गांधी याने या वेबसीरिजमध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे. त्याच्याशिवाय सतीश कौशिक, श्रेया धनवंतरी, निखील द्विवेदी, अनंत नारायण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications