Join us

विना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:47 PM

1 / 10
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर तिचा नवरा निक जोनससोबतचा फोटो शेअर केला आहे.
2 / 10
या फोटोत प्रियंका आणि निक एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिले की, कायम स्वरुपी माझाच. तुझ्यासाठी मी आभारी आहे. तिच्या या फोटोवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत.
3 / 10
प्रियंकाने नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने हेअरचा मेकओव्हर केला आहे. तिचा हा नवीन हेअर लूक भारी वाटतो आहे. तिने या फोटोंवर म्हटलंय की नवीन हेअर, डोंट केअर
4 / 10
सध्या प्रियंका चोप्रा तिची मॅरिड लाइफ एन्जॉय करते आहे.
5 / 10
एका मुलाखतीत प्रियंकाने मॅरीड लाइफबद्दल बोलताना निक बद्दल चकीत करणारी बाब सांगितली होती.
6 / 10
या मुलाखतीत प्रियंका म्हणाली होती की, प्रत्येक नॉर्मल कपलप्रमाणे माझ्यात आणि निकमध्ये भांडणं बोतात. जेव्हा कोणत्या गोष्टींवर वाद होतात, तेव्हा त्याला खूप राग येतो. तेव्हा निक नेहमी एक गोष्ट करतो.
7 / 10
ती पुढे म्हणाली की, जेव्हा मी वाद घालू लागते तेव्हा निक मला पकडून माझा चेहरा भिंतीकडे वळवतो आणि म्हणतो याचाशी बोल. जेव्हा तुला वाटेल की आपण मिळून बोलू शकतो तेव्हाच मी तुझा चेहरा माझ्याकडे वळवेन.
8 / 10
प्रियंका आणि निकने 1 आणि 2 डिसेंबर 2018 ला जोधपूर उमेद भवन पॅलेसमध्ये लग्नबेडीत अडकले होते. लग्नाचं फंक्शन फक्त तीन दिवस चालले.
9 / 10
लग्नानंतर प्रियंका व निकने तीन वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले होते.
10 / 10
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास